साथीचे पसरतेय.. खबरदारी घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:26 AM2021-08-22T04:26:37+5:302021-08-22T04:26:37+5:30
बार्शी : आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी नगरपरिषद सर्व खातेप्रमुख अधिकारी व ठेकेदार यांची संयुक्त आढावा बैठक घेतली. या ...
बार्शी : आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी नगरपरिषद सर्व खातेप्रमुख अधिकारी व ठेकेदार यांची संयुक्त आढावा बैठक घेतली. या बैठकीत बार्शीकर नागरिकांच्या आरोग्याची काळजी, विविध विकासकामासंबंधीचा आढावा, पाणीपुरवठा संबंधीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. यासाठी बार्शी नगरपालिकेच्या आरोग्य खात्याने योग्य ते नियोजन करावे व जनजागृती करावी. सध्या नगरपरिषदेमार्फत शहरातील प्रत्येक प्रभागात डास प्रतिबंधक मेलीथिऑन औषधाची एसटीपीद्वारे फवारणी सुरू आहे. या औषध फवारणीमुळे डासांपासून उद्भवणाऱ्या डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना अटकाव बसेल.
----
बार्शी शहराच्या पाणीपुरवठा याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासंबंधी आमदार राजेंद्र राऊत यांनी संबंधितांना सूचना केल्या. त्याचबरोबर, चांदनी पाणीपाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्र लवकरच सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
या आढावा बैठकीला नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, पक्षनेते विजय राऊत, कार्यालय अधीक्षक शिवाजी कांबळे, नगर अभियंता भारत विधाते, दिलीप खोडके, जलदाय अभियंता अजय होनखांबे, आरोग्य अधिकारी जयसिंग खुळे, ज्योती मोरे, करअधिकारी मयुरी शिंदे, संबंधित ठेकेदार उपस्थित होते.