प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत पाेरगं साहेब झालं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:23 AM2021-02-16T04:23:10+5:302021-02-16T04:23:10+5:30

मुलाच्या शिक्षणासाठी स्वप्न पाहुन परिस्थितीशी दोन हात करून सत्यवानचे शिक्षण पूर्ण केले. स्वत: शेतकरी असल्याने शेती हाच प्रमुख व्यवसाय. ...

Overcoming the adversity, Pareng Saheb became | प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत पाेरगं साहेब झालं

प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत पाेरगं साहेब झालं

Next

मुलाच्या शिक्षणासाठी स्वप्न पाहुन परिस्थितीशी दोन हात करून सत्यवानचे शिक्षण पूर्ण केले. स्वत: शेतकरी असल्याने शेती हाच प्रमुख व्यवसाय. दुसरा मोठा मुलगा नागनाथ गेंड याने आपल्या लहान भावासाठी अपार कष्ट केले. काही दिवस हमाली केली त्यानंतर दुकानात कामाला जावून घरचा प्रप्रंच भागवला. शेतीमध्ये तरकारी केली कधी यश आले तर कधी अपयश आले. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेवून सत्यवानने प्राथमिक, माध्यमिकचे शिक्षक अकलूजच्या वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना अभ्यासासोबत त्यांनी पोलीस भरतीचा अभ्यास सुरू केला. २०१२ मध्ये पहिल्याच प्रयत्नाच पोलीस कॉन्स्टेबल म्हणून राज्य राखीव पोलीस दलात रुजू झाला २०१५ साली त्यानंतर जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करून त्याने पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर तो एवढ्यावर न थांबता २०१७ मध्ये झालेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल २०२१ रोजी लागला व पहिल्याच प्रयत्नात तो उत्तीर्ण झाला अन् पाेरगं साहेब झाल्याचा आनंद झाल्याचे शंकर गेंड यांनी सांगितले.

पोफळज गावात पोलीस उपनिरीक्षक होणारा सत्यवान हा पहिलाच तरुण असल्याने ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, महाराष्ट्र करियर अकादमीचे संचालक पांडुरंग वायकर, माजी सरपंच मारूती पवार, अरूण पवार, ढेरे गुरूजी, अक्षय कुलकर्णी, बाळासाहेब पवार, बापू पवार, आबा पवार, दिगंबर पवार, भागवत पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो

१५सत्यवान गेंड-पोलीस उपनिरीक्षक

Web Title: Overcoming the adversity, Pareng Saheb became

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.