पायऱ्या नसलेल्या ८० फूट विहिरीतून दोरखंडाद्वारे बैलाला काढलं बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:20 AM2021-07-25T04:20:33+5:302021-07-25T04:20:33+5:30
लिंबीचिंचोळीचे शेतकरी हिराचंद गुरव यांची बैलजोडी आहे. त्यातील एक बैल पावसाच्या पाण्याबरोबर चालत जाऊन अनवधानाने गुरव यांच्या विहिरीत पडला. ...
लिंबीचिंचोळीचे शेतकरी हिराचंद गुरव यांची बैलजोडी आहे. त्यातील एक बैल पावसाच्या पाण्याबरोबर चालत जाऊन अनवधानाने गुरव यांच्या विहिरीत पडला. विहीर ८० फूट खोल असून ती पाण्याने अर्धवट भरलेली होती. बैल पाण्यात पडताच शेतकरी हिराचंद गुरव यानी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हाका मारून मदतीसाठी बोलावले.
या कामासाठी नागराज गोविंदे, जुबेर पाटील, अमोल गोविंदे, शिवराज माळी, येल्लू पाटील, गंगाधर माळी, अनिल कोरे, आबा कलशेट्टी, नागराज कलशेट्टी, नागराज पुजारी, देवराज कमळे, नागराज कोरे यांनी सहभाग घेतला.
---
इजा न होता बैल सुखरुप
विहिरीला पायऱ्या नव्हत्या. पाण्याने अर्धवट विहीर भरल्याने बैलाला सहजासहजी बाहेर निघणे शक्य नव्हते. तरुण शेतकऱ्यांनी विहिरीच्या चारी बाजूला दोरखंडाच्या साहाय्याने बांधून बैलाला पाण्यातून बाहेर काढले. दोन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर कोणतीही इजा न होता बैल पाण्याबाहेर काढण्यात यश आले. बैल सुखरूप बाहेर आल्याने हिराचंद गुरव यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.