करमाळ्यात शिवसेनेच्या वतीने ऑक्सिजन बँक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:21 AM2021-05-22T04:21:39+5:302021-05-22T04:21:39+5:30
--- शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने नुकतेच ७२२ नेत्र रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप, दिव्यांग व्यक्तींना वाकर, १४० रुग्णांना रेमडेसिविर ...
---
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने नुकतेच ७२२ नेत्र रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप, दिव्यांग व्यक्तींना वाकर, १४० रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कोरोना संसर्गाच्या काळात करमाळा शिवसेनेने मदतीला धावून जाण्याचे मोठे काम केले आहे.
----
यावेळी उपजिल्हाप्रमुख भरत अवताडे शहर प्रमुख विशाल गायकवाड युवासेना समन्वयक शंभूराजे फरतडे महिला आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रियंका गायकवाड, प्रा. अशोक नरसाळे, डॉ. संदेश शहा, डॉ. राजेश शहा, डॉ. रवी किरण पवार, युवा सेनेचे नागेश काळे, मयूर यादव, उपशहर प्रमुख संजय भालेराव, उमेश पवार, पंकज परदेशी, संतोष गान बुटे, माजी शहरप्रमुख संजय शीलवंत, शिवसेनेचे नेते डॉक्टर अमोल घाडगे, युवा सेनेचे तालुका उपाध्यक्ष प्रसाद निंबाळकर तनपुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
----
फोटो २१ करमाळा शिवसेना
ओळी : शिवसेनेच्या वतीने करमाळयात खाजगी हाॅस्पिटलला ऑक्सिजन मशीन देताना शिव सेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे, भरत अवताडे.