प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन बेड सुरू करणार : शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:19 AM2021-04-19T04:19:53+5:302021-04-19T04:19:53+5:30
जेऊर येथे ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये डेडिकेटेड कोविड सेंटर चालू करण्यासाठी आ. शिंदे यांनी रविवारी भेट देऊन ...
जेऊर येथे ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये डेडिकेटेड कोविड सेंटर चालू करण्यासाठी आ. शिंदे यांनी रविवारी भेट देऊन पाहणी केली व येणाऱ्या समस्यांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर गायकवाड उपस्थित होते.
कोरोनाविषयक समस्यांचा आढावा घेताना आ. संजयमामा शिंदे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना फोन करून जिल्ह्याला सध्या फक्त २० हजार लसींचा पुरवठा होत असून, तो वाढवून देण्याविषयी विनंती केली. ती विनंती आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ मान्य केली.
करमाळा तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १० ऑक्सिजन बेड सुरू करण्याविषयी चर्चा केली. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक चंद्रकात सरडे, लव्हेचे सरपंच विलास पाटील, तानाजी झोळ, चोभेपिंपरीचे सरपंच विक्रम उरमोडे, बालाजी गावडे, उमेश पाथ्रूडकर, डॉ. राहुल कोळेकर, डॉ. अमोल डुकरे व ग्रामस्थ उपस्थित होते.