ऑक्सिजन बेड, इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे रुग्णसंख्या गेली हाताबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:21 AM2021-04-25T04:21:35+5:302021-04-25T04:21:35+5:30

प्रशासनावर कोणाचाही वचक नसल्याने तसेच पदाधिकारी, अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने सांगोला तालुक्यात कोरोनाची परिस्थिती आवाक्याबाहेर गेली आहे. अखेर पालकमंत्री ...

Oxygen beds, lack of injections left the patient out of hand | ऑक्सिजन बेड, इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे रुग्णसंख्या गेली हाताबाहेर

ऑक्सिजन बेड, इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे रुग्णसंख्या गेली हाताबाहेर

Next

प्रशासनावर कोणाचाही वचक नसल्याने तसेच पदाधिकारी, अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने सांगोला तालुक्यात कोरोनाची परिस्थिती आवाक्याबाहेर गेली आहे. अखेर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी २३ एप्रिल रोजी पंचायत समितीच्या बचत भवनमध्ये अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

या बैठकीला आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, नगराध्यक्षा राणी माने, नगरसेविका छाया मेटकरी, सभापती राणी कोळवले, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार अभिजीत पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सीमा दोडमनी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

सांगोला तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार होण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी आमदार शहाजीबापू पाटील १ कोटी रुपये देणार आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू होईल. लसीकरणाची मागणी वाढली असल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी लसींचा कोटा वाढविण्याची मागणी केली असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

सकारात्मक बातम्यांसाठी सहकार्य करा

लसीकरणासाठी गर्दी होऊ नये यासाठी माळशिरस पॅटर्न तयार केला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यात कोरोनाची संख्या वाढल्याने कोण चुकलं, काय चुकलं हे पाहण्याची आता वेळ नाही. १ मे नंतर कोण चुकला असेल तर त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, यात कुणालाही सोडलं जाणार नाही असे सांगत अधिकारी काम करताना चुकले असतील पण, १ मे पर्यंत सकारात्मक बातम्यांचे सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

Web Title: Oxygen beds, lack of injections left the patient out of hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.