ऑक्सिजन पार्कमुळे बार्शीतील नागरिकांना मिळतोय आरोग्यदायी विरंगुळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:18 AM2020-12-23T04:18:56+5:302020-12-23T04:18:56+5:30

या उद्यानासाठी २ कोटी ४७ लाख रुपये खर्च आला असून, उद्यान अंतर्गत सुशोभिकरण, वनीकरण व अंतर्गत साधनांना ६० लाख ...

Oxygen Park provides healthy leisure to the citizens of Barshi | ऑक्सिजन पार्कमुळे बार्शीतील नागरिकांना मिळतोय आरोग्यदायी विरंगुळा

ऑक्सिजन पार्कमुळे बार्शीतील नागरिकांना मिळतोय आरोग्यदायी विरंगुळा

googlenewsNext

या उद्यानासाठी २ कोटी ४७ लाख रुपये खर्च आला असून, उद्यान अंतर्गत सुशोभिकरण, वनीकरण व अंतर्गत साधनांना ६० लाख रुपये खर्च आला आहे. ऑक्सिजन देणाऱ्या, डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या वनस्पती, रंगीबेरंगी नयनरम्य विविध जातींची फुलझाडे, आधुनिक पद्धतीची शोभिवंत झाडे हे या उद्यानाचे वैशिष्ट्य आहे. उद्यानामध्ये नागरिकांना फिरण्यासाठी सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतर्गत लांबीचा जॉगिंग ट्रॅक आहे. उद्यान अंतर्गत केलेल्या दोन छोट्या जलाशयामुळे या उद्यानाच्या सौंदर्यात भर पडली आहे. या जलाशयामधोमध छोटासा पूल उभारण्यात आलेला आहे. उद्यानांमध्ये निवांत बसून विसाव्याचे काही क्षण अनुभवण्यासाठी प्रेक्षक गॅलरी आणि तंबूच्या आकाराची तीन गजीबोही बांधण्यात आलेले आहेत. या उद्यानाला मजबूत संरक्षक कुंपण भिंत आणि भव्य प्रवेशद्वार आहे.

महानगरांच्या धर्तीवर ऑक्सिजन पार्कची गरज

सध्या वाढलेली वाहने, कारखान्यामुळे वातावरणामध्ये प्रदूषण निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना शुद्ध हवेत मोकळा श्वास घेता यावा आणि आल्हाददायक वातावरणात भरपूर ऑक्सिजन मिळावा, हा या पार्कचा उद्देश आहे. या पार्कमध्ये औषध वनस्पती, दुर्मीळ प्रजातीची झाडे आहेत. त्यामध्ये शरबरी, फ्लॉवरबेड, रोज प्लांट यांचा समावेश आहे, असे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीकडेही राहणार लक्ष

या ऑक्सिजन पार्कची सर्वांगाने सुबक निर्मिती झाली आहे. उद्यानामध्ये भूपृष्ठावर मोठ्या शहरातील पार्कमध्ये टाकली जाणारी गार्डन सोईल वापरली आहे. शहराच्या विविध भागात असे ऑक्सिजन पार्क उभारणार असून, त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देणार आहोत. पर्यावरणप्रेमी व्यक्ती, संस्थांकडे हे काम सोपविण्याचा मानस आहे, असे नगराध्यक्ष ॲड. आसिफ तांबोळी यांनी सांगितले.

फोटो

२२ बार्शी पार्क

ओळी

बार्शी येथे आकर्षक पद्धतीने साकारलेले ऑक्सिजन पार्क.

Web Title: Oxygen Park provides healthy leisure to the citizens of Barshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.