बूस्टर पंपासाठी रखडला जकराया शुगर्सचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:20 AM2021-05-17T04:20:32+5:302021-05-17T04:20:32+5:30
वटवटे (ता.मोहोळ) येथील जकराया शुगर्सने शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. ऑक्सिजन निर्मितीची ट्रायल, तसेच ...
वटवटे (ता.मोहोळ) येथील जकराया शुगर्सने शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. ऑक्सिजन निर्मितीची ट्रायल, तसेच त्याची शुद्धता तपासण्यात आली. १०० टक्के शुद्ध ऑक्सिजन निर्मिती होत आहे, दोन कोटींच्या या प्रकल्पासाठी १ कोटी २५ लाख खर्च झाला, पण बूस्टर पंपाअभावी सिलिंडर भरता येत नसल्याने निर्मिती थांबली आहे. भारतात हा पंप उपलब्ध नाही, तो कोरिया अथवा चीनकडून खरेदी करावा लागतो. त्यासाठी आणखी सहा आठवडे वाट पाहावी लागणार आहे.
---
हवेतून ऑक्सिजन निर्मिती
जकराया शुगरने उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पात इथेनॉलसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. हवेतील वायूंचे विघटन करून नायट्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे करण्यात येत आहे. शुद्ध ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी सिलिंडरमध्ये कॉम्प्रेस करून भरण्यासाठी बूस्टर पंपाची गरज आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हा बूस्टर पंप बनवला जातो.
-----
कोट
सध्या ऑक्सिजन निर्मितीची तयारी पूर्ण झाली असून, बूस्टर पंपाचा शोध सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही याबाबत सातत्याने पाठपुरावा आणि मला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. वेळेत ऑक्सिजन पुरविण्याची माझीही इच्छा आहे, परंतु तांत्रिक अडचण सुटत नाही.
- सचिन जाधव, कार्यकारी संचालक, जकराया शुगर्स वटवटे ता.मोहोळ.
--