काेविड सेंटरसाठी विठ्ठलराव शिंदे कारखान्यातर्फे ऑक्सिजन पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:20 AM2021-04-19T04:20:20+5:302021-04-19T04:20:20+5:30
: कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. माढा मतदारसंघातील कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत ...
: कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. माढा मतदारसंघातील कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याने विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामार्फत कुर्डूवाडी, माढा, टेंभुर्णी व मोडनिंब येथे सुरू असलेल्या कोविड सेंटरसाठी १० ऑक्सिजन मशीनचा पुरवठा केला आहे. आणखी मशीन देण्यात येणार असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
आमदार शिंदे म्हणाले, सध्या सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या कोरोना रुग्णांपैकी ज्यांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत, त्यांना या मशीनच्या सहाय्याने ऑक्सिजन पुरविला जाणार आहे. त्यामुळे रुग्णांची सोय झालेली आहे. रुग्णांचे प्राण वाचणे हे महत्त्वाचे आहे. ही मशीन हवेतून ऑक्सिजन घेऊन त्यावर कार्य करत असल्याने त्यास ऑक्सिजन सिलिंडरची वेगळी गरज नाही. यामुळे रुग्णाला ही मशीन वाचवण्यामध्ये मोठी मदत करते आहे, अशी माहिती आ. शिंदे यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक एस. आर. यादव व खातेप्रमुख उपस्थित होते.