रुग्णवाढीचा वेग मंदावला.. धावपळ थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:19 AM2021-05-30T04:19:26+5:302021-05-30T04:19:26+5:30

यामध्ये ऑक्सिजनच्या बेडचाही समावेश आहे. शहरातील दोन डेडिकेटेड हॉस्पिटल्समध्ये मात्र अद्यापही क्षमतेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. शहर ...

The pace of growth slowed down .. The rush stopped | रुग्णवाढीचा वेग मंदावला.. धावपळ थांबली

रुग्णवाढीचा वेग मंदावला.. धावपळ थांबली

Next

यामध्ये ऑक्सिजनच्या बेडचाही समावेश आहे. शहरातील दोन डेडिकेटेड हॉस्पिटल्समध्ये मात्र अद्यापही क्षमतेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. शहर व तालुक्यात पंधरा दिवसांपूर्वी दररोज शंभरपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत होते. हळूहळू चाचण्यांची संख्याही घटली तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्यादेखील घटली आहे. आता दररोज पन्नास ते ८० या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. बार्शी तालुक्यात एकूण १५ कोविड केअर सेंटर आहेत. त्याची एकूण क्षमता १४४७ असून, त्यामध्ये सध्या ३९६ रुग्ण उपचार घेत आहेत. येथे ८०१ बेड शिल्लक आहेत.

डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरची संख्या १२ आहे. येथे ऑक्सिजन व साधे मिळून ३७२ बेड आहेत. त्यामध्ये १९८ रुग्ण उपचार घेत आहेत, तर १७४ बेड हे शिल्लक आहेत. दोन्ही डेडिकेटेड हॉस्पिटल्स आजही फुल्ल आहेत. शहरात डॉ़ संजय अंधारे यांचं सुश्रूत हॉस्पिटल आणि डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल ही दोन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स आहेत. यांची रुग्ण क्षमता ही १८० आहे. या दोन्ही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे १९५ रुग्ण उपचार घेत आहेत. या दोन्ही हॉस्पिटलमध्ये सध्या तरी बेड शिल्लक नाहीत.

-----

बार्शी तालुक्यात आजपर्यंत एकूण १७ हजार ४२१ जण कोरोना बाधित झाले होते. त्यामध्ये १५ हजार ९६५ जण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर सध्या १०६० जणांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी एका दिवसात ११२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर पाचजणांचा मृत्यू झाला. आजअखेर तालुक्यातील मृतांचा आकडा हा ३९६ झाला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे यांनी सांगितले.

----

Web Title: The pace of growth slowed down .. The rush stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.