पडसाळी, पाथरी ग्रामपंचायती बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:11 AM2021-01-08T05:11:19+5:302021-01-08T05:11:19+5:30
उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. सोमवारी पाथरी व पडसाळी ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी ...
उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. सोमवारी पाथरी व पडसाळी ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी ९ जागेसाठी ९ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. राळेरास व हिरज ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत प्रयत्न झाले. मात्र काही उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यास नकार दिल्याने हिरज व राळेरासमध्ये प्रत्येकी दोन जागेसाठी निवडणूक लागली. हिरजचे ९, साखरेवाडी व राळेरासचे प्रत्येकी ५ सदस्य बिनविरोध झाले आहेत. वडाळा, बाणेगाव व भागाईवाडीत प्रत्येकी एक व तरटगाव येथील दोन सदस्यही अविरोध झाले आहेत. तालुक्यातील नऊ गावातील ४२ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
अविरोध झालेले सदस्य पाथरी : श्रीमंत बंडगर, आनंद बंडगर, उमेश पाटील, लक्ष्मी समाधान मळगे, सुवर्णा संजय वाघमोडे, सोनाली गायकवाड, पंकज मसलखांब, सुनीता वाघमोडे, राजश्री माने.
पडसाळी : अजित सिरसट, माणिक राऊत, स्वाती सिरसट, तबस्सुम शेख, रेणुका माळी, ज्योत्स्ना पाटील, सिमिंताबाई भोसले, महादेव भोसले, धर्मा रोकडे.
राळेरास : नागनाथ माने, रुपाली राशिनकर, स्वाती नागोडे, स्वप्ना जाधव, केशर कांबळे
हिरज : बद्रिनाथ नागटिळक, गंगुबाई तमशेट्टी, गीता लिंबोळे, सुनीता बसवंती, दिलीप रुपनर, प्रशांत साबळे, सखुबाई साठे, सुरेखा माळी, राणी यलगुंडे
साखरेवाडी : रेवणसिद्ध साखरे, हिराबाई सुतार, सीमा कांबळे, राधा ताटे, माधुरी क्षीरसागर
बाणेगाव: वैजयंती वनकोंबडे.