पंचायत राज समितीकडून सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या कामांची पाहणी सुरू, जि़प़ प्रशासनाच्या माहिती संकलनाचे समितीकडून कौतुक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:53 PM2018-02-08T12:53:20+5:302018-02-08T12:55:42+5:30
पंचायत राज समितीकडून जिल्हा परिषदेने राबविलेल्या विविध कामांची पाहणी दौरा सकाळपासून सुरू करण्यात आला़ पाहणी दौºयासाठी १६ आमदारांच्या पाच टीम ग्रामीण भागात फिरत आहेत़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८ : पंचायत राज समितीकडून जिल्हा परिषदेने राबविलेल्या विविध कामांची पाहणी दौरा सकाळपासून सुरू करण्यात आला़ पाहणी दौºयासाठी १६ आमदारांच्या पाच टीम ग्रामीण भागात फिरत आहेत़ सध्या जि.प.चा पशुसंवर्धन विभाग, समाजकल्याण विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभागातील बोगस कारभार चर्चेत आहे. त्यामुळे समितीच्या दौºयाकडेही लक्ष आहे.
जिल्हा परिषदेशी संबंधित यंत्रणांचा लेखा-जोखा तपासण्यासाठी जिल्हा दौºयावर आलेल्या पंचायत राज समितीने पहिल्या दिवशी आर्थिक निरीक्षण अहवालावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांची बुधवार ७ फेबु्रवारी रोजी साक्ष घेतली. दिवसभर चाललेल्या या साक्षीत आमदारांनी जि. प. प्रशासनाच्या माहिती संकलनाचे कौतुक केले. शिवाय त्रुटींबद्दल काही सूचनाही केल्या.
सकाळी शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांचे स्वागत केले. यानंतर समितीने जिल्ह्यातील विधानमंडळाचे सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांशी चर्चा केली. उमेश पाटील यांनी समस्यांची जंत्री मांडली. कारभारावर टीकाही केली. सचिन देशमुख यांनी वैद्यकीय अधिकाºयांची रिक्त पदे भरण्याची मागणी केली. यानंतर जिल्हा परिषदेत अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, समाजकल्याण सभापती शीला शिवशरण, महिला व बालकल्याण समिती सभापती रजनी देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले. यानंतर यशवंतराव चव्हाण सभागृहात समितीने कामाचा आढावा घेतला. मागील तीन वर्षांतील लेखापरीक्षण अहवालावर चर्चा झाली.
---------------------
सीईओ राजेंद्र भारुड यांचे काम चांगले...
- पहिल्या दिवशी आर्थिक विषयासंदर्भात आढावा झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य वित्त व लेखाधिकारी गौतम जगदाळे यांनी उत्तरे दिली. डॉ. भारुड यांच्या कार्यपद्धतीवर आमदार पारवे खुश दिसले. डॉ. भारुड हे अभ्यासू आहेत. गरजूंपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी ते सकारात्मक आहेत. पंचायत राजच्या दौºयामुळे त्यांच्या कामाला आणखी गती मिळेल आणि काही राहिलेल्या त्रुटीही दूर होतील, असा विश्वास पारवे यांनी व्यक्त केला.
---------------
या आमदारांची आहे पंचायत राज समितीत उपस्थिती
- समिती प्रमुख तथा आमदार सुधीर पारवे, आमदार दिलीप सोपल, आमदार भारत भालके, सुरेश खाडे, तुकाराम काते, भारत गोगावले, अमरनाथ राजूरकर, डॉ. देवराव होळी, विक्रम काळे, दत्तात्रय सावंत, रणधीर सावरकर, श्रीकांत देशपांडे, वीरेंद्र जगताप, चरण वाघमारे, राहुल मोटे, सतीश सावंत.
------------------
तालुकानिहाय दौरे
- गट १ : अक्कलकोट, दक्षिण सोलापूर : सुधीर पारवे, राहुल बोंद्रे, सुरेश खाडे.
- गट २: बार्शी, माढा : दिलीप सोपल, तुकाराम काते, भरत गोगावले.
- गट ३ : उत्तर सोलापूर, करमाळा, मोहोळ : वीरेंद्र जगताप, चरण वाघमारे, राहुल मोटे, सतीश सावंत.
- गट ४: पंढरपूर, मंगळवेढा : भारत भालके, अमरनाथ राजूरकर, डॉ. देवराव होळी, विक्रम काळे.
- गट ५: सांगोला, माळशिरस : दत्तात्रय सावंत, रणधीर सावरकर, श्रीकांत देशपांडे.
-------------------
पारवेंचा इशारा
- समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राज्याच्या कल्याणकारी योजना तळागाळात पोहोचल्या पाहिजेत. हे होतेय की नाही, हे पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत. कामात हयगय दिसली तर त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला.