कोरोना हॉटस्पॉट झाल्याने पंचायत समिती कार्यालय अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:08+5:302021-03-28T04:21:08+5:30
गर्दी कमी करण्यासाठी अर्ज, निवेदने, मागणी सूचनापत्रे ऑनलाइन स्वीकारली जाणार आहेत. पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळ प्रस्ताव, मागणी व ...
गर्दी कमी करण्यासाठी अर्ज, निवेदने, मागणी सूचनापत्रे ऑनलाइन स्वीकारली जाणार आहेत. पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळ प्रस्ताव, मागणी व निवेदने स्वीकारण्याची सोय केली आहे. यामुळे कार्यालयातील वाढती गर्दी कमी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सहाय्य होणार आहे. यादृष्टीने पंचायत समितीने परिपत्रकाद्वारे नागरिक व अधिकाऱ्यांना नियमावलीबाबत कळविले असल्याची समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी दिली.
अर्ज सादर करण्यासाठी दिलेल्या malshirasbdo@gmail.com या मेल वरती अभ्यागत नागरिक, क्षेत्रीय कर्मचारी त्यांचा अर्ज सादर करू शकतात. अर्जाचा तपशील संक्षिप्तपणे नोंद करून ती पाठवता येईल, असेही गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले.
टेस्टनंतरच कार्यालयात प्रवेश
गर्दीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह एकूण २२५ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. यात दोन पॉझिटिव्ह केसेस सापडल्या. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयीन वेळेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकांची रॅपिड टेस्ट करण्याची सोय केली आहे. टेस्ट केल्यानंतरच कार्यालयात प्रवेश दिला जाणार आहे.
पंचायत समितीत ग्रामीण भागाचा थेट संबंध येतो. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता कडक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे.
कोट :::::::::::::::
स्वतःच्या व समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांनी नियमांचे पालन करावे. कोरोना लढाईत आपले योगदान द्यावे.
- अर्जुनसिंह मोहिते-पाटील
उपसभापती, पंचायत समिती