पंढरपूर: ७२ ग्रामपंचायतीसाठी ८८ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:18 AM2020-12-25T04:18:46+5:302020-12-25T04:18:46+5:30

पंढरपूर पंचायत समिती तहसील कार्यालयाच्या परिसरात अशा चार ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोय प्रशासनाकडून करण्यात आली आहे. गुरुवारी ...

Pandharpur: 88 applications filed for 72 gram panchayats | पंढरपूर: ७२ ग्रामपंचायतीसाठी ८८ अर्ज दाखल

पंढरपूर: ७२ ग्रामपंचायतीसाठी ८८ अर्ज दाखल

Next

पंढरपूर पंचायत समिती तहसील कार्यालयाच्या परिसरात अशा चार ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोय प्रशासनाकडून करण्यात आली आहे. गुरुवारी पंढरपूर तालुक्यातील वाखरी ५, गादेगाव १, चिलाईवाडी २, रांझणी १, उंबरे ७, पिराची कुरोली ३, आंबे चिंचोली ३, फुलचिंचोली १, नारायण चिंचोली २, भाळवणी १, शंकरगाव नळी २, भंडीशेगाव २, शिरढोण ९, सरकोली १, जैनवाडी १८, पळशी २१, भटुंबरे ८ अशा ८० उमेदवारांनी ८६ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता त्यानंतर शुक्रवार, शनिवार, रविवार अशा सलग तीन सुट्ट्या आल्या आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर आहे. त्यामुळे महिनाअखेरीच्या तीन दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खरी गर्दी होणार आहे. तोपर्यंत गावागावात पॅनल, उमेदवार, त्यांची कागदपत्रे एकत्र करण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू आहे.

Web Title: Pandharpur: 88 applications filed for 72 gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.