पंढरपूर निवडणूक प्रतिक्रिया....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:17 AM2021-05-03T04:17:30+5:302021-05-03T04:17:30+5:30

- रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार ---- या निवडणुकीत आम्हाला विजय अपेक्षित होता. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी साम, दाम, दंड, भेद ...

Pandharpur election reaction .... | पंढरपूर निवडणूक प्रतिक्रिया....

पंढरपूर निवडणूक प्रतिक्रिया....

Next

- रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार

----

या निवडणुकीत आम्हाला विजय अपेक्षित होता. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर केल्यामुळे अपेक्षित मताधिक्य आम्हाला मिळाले नसले तरी जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. या निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. याअगोदर पंढरपूर-मंगळवेढ्याला एक आमदार होता. मात्र आता आमदार प्रशांत परिचारकांसोबत मी स्वत: आमदार झालो आहे. त्यामुळे आम्ही दोघं मिळून पंढरपूर-मंगळवेढ्याचा सर्वांगीण विकास करू. मंगळवेढ्याच्या ३५ गावांच्या पाण्यासाठी केंद्रातून निधी आणण्यासाठी प्रयत्न करत असताना इतर समस्याही सोडविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे.

- समाधान आवताडे, नूतन आमदार

कोट :::::::::::::::::::::::::::::::::::::::

सध्याच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा बाजूला ठेवत मृत्यूचे राजकारण करत भावनिक मुद्द्यावर मतं मागण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागील तीन निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीतही लोकांच्या अस्मितेचा मुद्दा असलेल्या ३५ गावांच्या पाणीप्रश्नासंदर्भात खोटी कागदपत्रं घेऊन राज्याचे अख्खे आघाडी सरकार मैदानात उतरले होते. मात्र यावेळी पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जनतेने कोणत्याही भूलथापांना बळी न पडता भाजपच्या उमेदवारास मतदान केले आहे. हा विजय परिचारक-आवताडे परिवाराच्या एकतेचा विजय आहे. पांडुरंग परिवारातील परिचारक प्रेमींनी स्व. सुधाकरपंतांना श्रद्धांजली वाहायची या हेतूने तन, मन, धन एकत्र करत रात्रंदिवस केलेल्या कष्टाचा हा विजय असून, भविष्यात महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून काम करू.

- प्रशांत परिचारक,आमदार

-----

राष्ट्रवादीचे नेते ‘नॉट रिचेबल’

मागील १५ दिवसांपासून महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आहेत. शिवाय स्व. भारत भालके यांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेवर ही जागा आम्ही मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणू, अशा आत्मविश्वासात असणारे महाविकास आघाडीतील पदाधिकारी पराभव झाल्यानंतर प्रतिक्रिया देण्यासाठी एकही नेता पुढे येताना दिसत नव्हता. उमेदवार भगीरथ भालके यांच्याशिवाय निवडणुकीची सूत्रे सांभाळणारे आ. संजय शिंदे व इतर पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते नॉट रिचेबल असल्याचे चित्र दिसून आले.

Web Title: Pandharpur election reaction ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.