पंढरपूरात आमदार भारत भालके व पोलीसांमध्ये वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 14:47 IST2018-07-21T14:46:16+5:302018-07-21T14:47:06+5:30

पंढरपूरात आमदार भारत भालके व पोलीसांमध्ये वादावादी
सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणावरून सोलापूर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे़ शनिवारी सकाळी पंढरपूर शहरात मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनावेळी पोलीसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना आ़ भारत भालके व पोलीस अधिकाºयांमध्ये किरकोळ वादावादी झाली़
पंढरपूर शहरात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड व संभाजी ब्रिगे्रडचे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले़ यावेळी पोलीसांनी रामभाऊ गायकवाड व किरण घाडगे यांना ताब्यात घेत असताना आ़ भारत भालके यांनी या आंदोलनकर्त्यांना अटक करू नका असे सांगितले़
यावेळी पोलीसांनी अटक करून सोडून देतो असे म्हटले़ यावेळी आ़ भारत भालके यांनी त्यांना अटक करू नका अन्यथा राज्यभर वणवा पेटेल असे सांगितले, मात्र पोलीस आ़ भारत भालके यांची गोष्ट ऐकली नाही त्यामुळे पोलीस अधिकारी व आ़ भालके यांच्यात किरकोळ वादावादी झाली़