चहावाल्याच्या त्या मृतदेहावर पंढरपूर नगरपालिकेने केले अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 01:05 PM2020-08-07T13:05:35+5:302020-08-07T13:05:46+5:30
कोरोना अहवाल उशिराने आल्याने झाला होता मृत्यू; नातेवाईकांच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे
पंढरपूर : कोविड हॉस्पिटलमध्ये उपचाराअभावी मरण पावलेल्या ‘त्या’ चहावाल्याच्या मृतदेहावर नगरपालिकेने अंत्यसंस्कार केल्याची माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी गुरुवारी दिली.
पंढरपुरातील एका चहावाल्याचा बुधवारी मृत्यू झाला होता़ त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी कोरोना टेस्ट केली़ यामध्ये चहावाला पॉझिटिव्ह आला़ त्यामुळे नातेवाईकांनी तातडीने त्याला शहरातील केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु तेथील डॉक्टरांनी अहवाल आल्याशिवाय उपचार सुरू करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याचे नातेवाईक अहवालाच्या प्रतीक्षेत बसले, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.
संतप्त नातेवाईकांनी मृतदेह घरी नेला़ ही माहिती मिळताच नगरपरिषदेच्या कर्मचाºयांनी तेथे धाव घेतली नातेवाईकांनी त्या हॉस्पिटलवर कारवाई करण्याबाबत तक्रार अर्ज दिला, त्यानंतर नगरपरिषदेच्या कर्मचाºयांनी त्या चहावाल्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. नातेवाईकांनी तक्रार केलेला अर्ज चौकशीसाठी आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.