व्हॉट्सअॅपवर आत्महत्येची धमकी देऊन पंढरपूरचा पोलीस गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:40 PM2018-12-01T12:40:22+5:302018-12-01T12:42:53+5:30
दोन दिवसांपासून शोध : पोलीस निरीक्षकाविरुद्ध केली तक्रार
पंढरपूर : तालुका पोलीस ठाण्यामध्ये अधिकारी व कर्मचाºयांमध्ये चांगलीच तू तू मैं मैं चालू आहे. राहुल शिवाजी जगताप या पोलीस कर्मचाºयाने चक्क अधिकाºयालाच आत्महत्या करण्याची धमकी देऊन दोन दिवसांपासून गायब झाला आहे.
पंढरपूर तालुका पोलिसांचा पीएस पंढरपूर (टी) असा व्हॉट्सअॅपचा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये पोलीस कर्मचारी व अधिकाºयांचा सहभाग आहे. या ग्रुपवर राहुल शिवाजी जगताप यांनी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याविरुद्ध पोस्ट व्हायरल केली आहे. त्या पोस्टद्वारे राहुल जगताप म्हणतात, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये दोन कर्मचारी सोडून बाकी सर्व कर्मचारी यांना हात जोडून.... राहुल शिवाजी जगताप पुढे लिहितात, तुमच्या बरोबर काम करत असताना काही चूक झाली असेल तर माफी असावी. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व पोलीस कर्मचारी आरकिले हे संगनमत करून खोट्या डायरी व ड्युटीचा त्रास देत आहेत. त्यामुळे मी आज आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येस अधिकारी, कर्मचारी जबाबदार असून माझ्या जाण्यानंतर माझ्या कुटुंबास न्याय मिळावा ही शेवटची इच्छा... असे निवेदन राहुल यांनी सोशल मीडियावर केले आहे.
प्रिय राहुल असं काही करण्याची आवश्यकता नाही
- यानंतर प्रिय राहुल, तुला असं काही करण्याची आवश्यकता नाही. तुझे म्हणणे आणि अडचणीबाबत वरिष्ठांकडे दाद मागू शकतो, असा सल्ला पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिला असतानाही राहुल जगताप हे मागील दोन दिवसांपासून गायब झाले आहेत. यामुळे राहुल जगताप यांच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता १०७ प्रमाणे प्रतिबंधक कायदा कायद्यानुसार कारवाई होणार हे मात्र अटळ आहे.