पंढरपुरात घरकुलाच्या कामावरुन भाजपा राष्ट्रवादीत तापलं राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:29 AM2021-02-27T04:29:24+5:302021-02-27T04:29:24+5:30

शहरातील गोपाळपूर रस्त्यावरील नगर पालिकेच्या मालकीच्या सर्व्हे नं.१७ ब मध्ये शहरातील बेघर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना माफक किमतीत ...

In Pandharpur, politics became hot in BJP NCP due to housework | पंढरपुरात घरकुलाच्या कामावरुन भाजपा राष्ट्रवादीत तापलं राजकारण

पंढरपुरात घरकुलाच्या कामावरुन भाजपा राष्ट्रवादीत तापलं राजकारण

Next

शहरातील गोपाळपूर रस्त्यावरील नगर पालिकेच्या मालकीच्या सर्व्हे नं.१७ ब मध्ये शहरातील बेघर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना माफक किमतीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे देण्यासाठी उभारणी होत आहे. एकूण ४२०० घरे बांधण्यात येत आहेत. यापैकी ९०० च्या आसपास घरे बांधण्यात आली. मात्र काही दिवसापूर्वी चंद्रभागा नदीवर बांधलेला घाट अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने खचून कोसळला होता. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे पंतप्रधान आवास योजनेचे कामदेखील पूर नियंत्रण रेषेत होत आहे. त्या परिसरात अधिक काळी माती आहे. घरकुलाची इमारत बांधण्यात येत असलेल्या परिसरात पुराचे पाणी साठले होते. यामुळे हे काम इतर ठिकाणी करावे, कामाची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे श्रीकांत शिंदे व संदीप मांडवे यांनी केली होती. याची दखल घेत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पास नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलेली स्थगिती दिली होती.

कामावरची स्थगिती २५ फेब्रुवारीपर्यंत न उठविल्यास येत्या शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) नगरपालिकेसमोर आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली धऱणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा माहिती भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम शिरसाट आणि माजी उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांनी केला होता. त्याचबराबेर राष्ट्रवादीनेही स्थगिती उठवू नये यासाठी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आंदोलने करण्यास बंदी दिली आहे. यामुळे भाजपा आमदार परिचारक यांनी काही दिवस आंदोलनाला स्थगिती दिली आहे. यामुळे पंतप्रधान आवास योजनेच्या कामावरची स्थगिती उठली नाही, परंतु आंदोलनाला मात्र काही दिवसांची स्थगिती देण्याची वेळ पुढाऱ्यांवर आली आहे.

राजकीय हेतूने योजनेला होतो विरोध

पंढरपूर शहरात प्रधानमंत्री घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प सल्लागार नियुक्त करून त्यांच्या अहवालानुसार शहरातील सर्व्हे क्रमांक १७ ब येथे भागीदारी तत्वावर परवडणारी घरे या योजनेंतर्गत प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. राज्य शासनाकडून आवश्यक त्याला मंजुऱ्या प्राप्त करून २ हजार ९२ घराच्या प्रकल्पाची महारेरा अंतर्गत नोंदणी करण्यात आली. या योजनेचे काम प्रगतीपथावर असून, पहिल्या टप्प्यातील ८९२ घरकुलांचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप करण्याकरता पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात येत असताना व लॉटरी पद्धतीने घरकुलांचे वाटप करण्यासाठी २६ जानेवारी रोजी सोडतही काढण्यात येणार होती मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून राजकीय हेतूने खोट्या तक्रारी करतात. पंढरपूरमध्ये विकास कामे सुरु झाली. काही मंडळी विरोध सुरु करतात. यामुळे शहरात विकास कामांना गती निर्माण होत नाही असे आ. प्रशांत परिचारक यांनी सांगितले.

फोटो : पंढरपूर नगर परिषदेच्या बाहेर आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देताना पंढरपूर विकास आघाडीचे व भाजपाचे नगरसेवक व आ. प्रशांत परिचारक.

Web Title: In Pandharpur, politics became hot in BJP NCP due to housework

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.