पंढरपुरात मिळाला बेदाण्याल्या प्रतिकिलो ३०५ रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:26 AM2021-08-28T04:26:22+5:302021-08-28T04:26:22+5:30
पंढरपूर कृषी उत्पन्न बाासमितीमध्ये प्रत्येक मंगळवारी व शनिवारी बेदाणा सौदे होतात. मंगळवारी तुलसी ट्रेडिंग कंपनी या आडत दुकानात तालुक्यातील ...
पंढरपूर कृषी उत्पन्न बाासमितीमध्ये प्रत्येक मंगळवारी व शनिवारी बेदाणा सौदे होतात. मंगळवारी तुलसी ट्रेडिंग कंपनी या आडत दुकानात तालुक्यातील करकंब येथील दिगंबर रामचंद्र घाटुळे यांच्या ५० बॉक्स बेदण्यास प्रति किलो ३०५ रुपये प्रति असा दर मिळाला आहे. हा माल स्वप्नील रसिक कोठाडिया यांनी खरेदी केला आहे. यावेळी झालेल्या बेदाणा सौद्यावेळी १०० ते ३०५ रुपये असे दर मिळाले आहेत. आ. प्रशांत परिचारक व युटीपियन साखर कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाने व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना योग्यत्या सुविधा दिल्या जातात. १५० गाडीची आवाक होऊन १३१ गाडी बेदाण्याची विक्री झाल्याची माहिती दिलीप घाडगे यांनी दिली.
त्याचबरोबर सध्या बेदाणा मालाला उठाव व मागणी चांगली आहे. व्यापारी मोठ्या प्रमाणावर माल खरेदीसाठी येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव
असल्याने गर्दी न करता आडते व व्यापारी सर्व नियम पाळून माल विक्री करीत असल्याचे उपसभापती विवेक कचरे यांनी सांगितले. यावेळी बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ डोंबे, उपाध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, संचालक शैलेंद्र नवाळे, सिकंदर बागवान उपस्थित होते.