पंढरपुरात व्यापाऱ्याचे घर फोडून पावणेसोळा लाखांच्या मुद्देमालाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:20 AM2020-12-24T04:20:36+5:302020-12-24T04:20:36+5:30
पंढरपूर : पंढरपुरातील फर्निचरचे व्यापारी अजित फडे यांच्या घरातून सोने, चांदी व रोख रक्कम असा एकूण १५ लाख ७० ...
पंढरपूर : पंढरपुरातील फर्निचरचे व्यापारी अजित फडे यांच्या घरातून सोने, चांदी व रोख रक्कम असा एकूण १५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेल्याची घटना १ ते १३ डिसेंबरदरम्यान घडली आहे. याबाबत संजीवनी फडे यांनी मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
महावीर नगरातील संजीवनी फडे यांनी बेडच्या ड्रॉवरमध्ये सोने व चांदी साडीमध्ये बांधून लपवून ठेवले होते.
सोने, चांदीचे दागिने, पितळीची भांडी व रोख रक्कम असा एकूण १५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी नजर चुकवून चाेरून नेला आहे.
यामध्ये १२ लाख ६३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, २ लाख ३ हजार ७०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने व वस्तू, ९०० रुपयांच्या पितळाच्या समई व भांडी, १ हजार रुपये किमतीचा कॅमेरा, ५०० रुपयांचा मोबाइल, ५० हजार रुपये किमतीचा सोने, मोती असलेला खंडेलवालचा सेट व ५० हजार रुपयाची रोख रक्कमेचा सहभाग आहे. चोरीची तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक अरुण पवार, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.