पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रातील पंगत बंद...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 02:25 PM2020-03-16T14:25:02+5:302020-03-16T14:28:28+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय; शासनाच्या निर्णयाचे केले पालन
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. मात्र कोरोनाच्या धर्तीवर समितीने अन्नछत्रातील प्रसाद वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपºयातून भाविक येत असतात. त्या विठ्ठल भक्तांची सोय व्हावी. यासाठी मंदिर समितीच्या वतीने भाविकांना रोज विविध प्रकारच्या पदाथार्चे प्रसाद स्वरूपात जेवण दिले जाते. हे जेवण तुकाराम भवन येथे दिले जाते. याचा लाभ १५०० ते २००० भाविक घेतात. यामुळे तुकाराम भवन येथे गर्दी होते.
सध्या गर्दी टाळावी असे आदेश शासन स्तरावर देण्यात आले आहेत. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समतीच्या अन्नछत्रातील पंगत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एका तुकाराम भवनाच्या बाहेर खिडकीतून प्रसाद वाटप होणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.