Pandharpur Wari: कोण मुख्यमंत्री?... आधी टोलचे पैसे द्या; टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याचा वारकऱ्यांशी उद्धटपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 10:58 AM2022-07-08T10:58:09+5:302022-07-08T11:26:40+5:30
Pandharpur Wari: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी पंढरपूर आषाढी वारीसाठी येणाऱ्या वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय घेतला, मात्र या निर्णयाचे नाक्यावर पालन केले जात नसल्याचे धक्कादायक वास्तव्य सोलापूर -पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर दिसून आले.
- आप्पासाहेब पाटील / यशवंत सादुल
सोलापूर - वेळ सकाळी 8 वाजताची...स्थळ सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोल नाका.. एकामागून एक गाड्या टोल नाका पास करीत होत्या, एवढ्यात भगवा झेंडा लावून आलेली वारकऱ्यांची जीप टोलनाक्यावर आली..टोल वर येताच जीप मधील वारकऱ्यांनी विठ्ठलाचा जयघोष केला. नाक्यावरील कर्मचाऱ्यांने टोल च्या पैशाची मागणी केली यावेळी त्या गाडीतील वारकऱ्यांनी सांगितलं आम्ही वारकरी आहोत..पंढरपूरला निघालोय मुख्यमंत्र्यांनी टोलमाफी केली आहे टोल घेऊ नका.. यावेळी नाक्यावरील कर्मचाऱ्याने कोण मुख्यमंत्री माहित नाही...ते केबिन मध्ये बसून काहीही सांगतात, अगोदर पैसे द्या असा सवाल केल्यानंतर संतप्त झालेल्या वारकऱ्यांनी टोलनाक्यावर वाद घातला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी पंढरपूर आषाढी वारीसाठी येणाऱ्या वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय घेतला, मात्र या निर्णयाचे नाक्यावर पालन केले जात नसल्याचे धक्कादायक वास्तव्य सोलापूर -पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर दिसून आले.
वारकऱ्यांसाठीची टोलमाफी कागदावरच?
— Lokmat (@lokmat) July 8, 2022
कोण मुख्यमंत्री?... आधी टोलचे पैसे द्या; टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याचा उद्धटपणा #Pandharpurwari#Tollplaza#EknathShinde#maharashtragovernmentpic.twitter.com/VBIWU4mSx0
आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे साजरा केला जातो यासाठी आंध्र कर्नाटक व अन्य जिल्ह्यातील हजारो वाहने सोलापूर मार्गे पंढरपूरला जातात. मराठवाड्यातून येणाऱ्या वाहनांना टोल घेतला जात नाही असे एका वाहन चालकाने सांगितले, सोलापुरातील तरीही सोलापूर पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावर टोलच्या पैशाची मागणी केली जाते असा आरोप लोहारा तालुक्यातील शरणाप्पा कडबाने, भास्कर पाटील, अमोल गायकवाड, महादेव धारुळे, शिवाजी गायकवाड, पिकू जाधव, लक्ष्मण जगदाळे आदींनी व्यक्त केली.
फास्टटॅग अन् घोळच घोळ...
राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या प्रत्येक गाड्यांना फास्टटॅग बंधनकारक केले होते, टोलनाक्यावरील गर्दी कमी करण्यासाठी सर्वच वाहनांच्या समोरील काचेवर फास्टटॅग बसवण्यात आले आहे. टोल माफीचा निर्णय घेण्यात आला असला तरी वारकऱ्यांचे वाहन टोलनाक्यावरून गेल्यावर पैसे कट झाला तर मेसेज व अंधारकांच्या मोबाईलवर येत असल्याचे वाहनधारकाने सांगितले.
निर्णय चांगला पण प्रक्रिया चुकीची
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफीचा निर्णय घेतला तो चांगला आहे मात्र वारकऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी करावी त्यांच्याकडून स्टिकर घ्यावे ते स्टिकर वाहनांना लावल्यास टोल माफी मिळणार असे सांगितल्यामुळे वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी मिळणे थोडे अवघडच आहे, ज्या वाहनांना भगवा झेंडा आहे ज्या वाहनातील लोकांकडे टाळ मृदुंग विना व इतर वारी संदर्भातील साहित्य असेल त्या वाहनांना टोल माफी द्यावी व प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणारी किचकटपुर गेल्या थांबवावी अशी मागणी ह.भ. प. सुधाकर इंगळे महाराज यांनी दिली.