माघी यात्रेपूर्वीच पंढरपूर झाले रिकामे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:33 AM2021-02-23T04:33:51+5:302021-02-23T04:33:51+5:30
पंढरपूर शहर व तालुक्यातील मठांची तपासणी करण्यासाठी उपविभागीय पाेलीस अधिकारी विक्रम कदम यांनी चार पथके तयार केली. या पथकांनी ...
पंढरपूर शहर व तालुक्यातील मठांची तपासणी करण्यासाठी उपविभागीय पाेलीस अधिकारी विक्रम कदम यांनी चार पथके तयार केली. या पथकांनी शनिवारी व रविवारी शहरातील १३७ मठ तर ग्रामीण भागातील १२० मठ असे एकूण २५७ मठांची तपासणी केली. तपासणी दरम्यान शनिवारी मठामध्ये भाविकांची संख्या मोठी होती. मात्र रविवारी भाविकांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर मठामध्ये अचानक भेट देण्याचे काम पोलिसांकडून होत आहे. यामुळे मठातील भाविक आपल्या गावाकडे परतण्यावर भर देत आहेत.
४० हजार भाविक एसटीने परतले
शनिवारी दिवसभरात पंढरपुरातून २२ हजार प्रवासी बाहेर गेले होते. तर रविवारी रात्री ७ वाजेपर्यंत १८ हजार प्रवासी एसटीने आपल्या गावी गेले आहेत. पंढरपुरातून रविवारी पुण्याकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याची माहिती पंढरपूर आगार प्रमुख सुधीर सुतार यांनी दिली.
फोटो
२१पंढरपूर०२
पंढरपुरातील मठाची तपासणी करताना पोलीस कर्मचारी.