उघड्यावर शौचास बसणा-यांवर कायदेशीर कारवाई करणार, पंढरपूर मुख्याधिकारी बापट यांचा इशारा
By admin | Published: June 28, 2017 06:32 PM2017-06-28T18:32:31+5:302017-06-28T18:32:31+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि. 28 - पंढरपूर शहरात आषाढी यात्रेच्या कालावधीत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पंढरपूरचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिला आहे.
पंढरपूर येथे आल्यानंतर नागरिकांनी सार्वजनिक जागेत घाण करु नये. शौचासाठी नगरपालिकेने बांधलेल्या संडासचा उपयोग करावा. नदीचे पात्रात,सार्वजनिक जागेत, अगर बाहेर कोठेही शौचास बसू नये. उघडयावर शौचविधी करण्याऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नदीपात्रात शौचास बसू नये किंवा नदीचे पात्र प्रदूषीत होईल असे कृत्य करणारा विरुध्द मुंबई पोलीस कायदा कलम ११५ अन्वये दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे.
नदी मध्ये वाहने,जनावरे धुणे, कचरा टाकणे, असे कृत्य करु नये. यात्रेकरुनी नदीचे पाणी पिऊ नये. नळाचे पाणी प्यावे. नासकी, कच्ची फळे खाऊ नयेत. शिळे अन्न खाऊ नये. कचरा कचरापेटीतच टाकावा, सार्वजनिक रस्त्यावर किंवा मोकळया जागेत कचरा टाकू नये घंटा गाडीकडे द्यावा. दशमी एकादशी व द्वादशी यादिवशी घंटागाडी सकाळी व रात्री अशी दोन वेळा निघेल याची घरमालक, मठाधिपती व नागरिकांनी नोंद घ्यावी. शहरातील नागरिकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत बांधून ठेवावीत. मोकाट जनावरे व त्यांचे मालक यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन बापट यांनी केले आहे.