पंढरपुरात भाजपला धक्का; राष्ट्रवादीच्या भारत भालकेंची हॅट्रीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 04:33 PM2019-10-24T16:33:13+5:302019-10-24T16:45:12+5:30
Pandharpur Vidhan Sabha Election Results 2019:सुधाकरपंत परिचारकांचा केला पराभव; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
पंढरपूर : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचे उमेदवार भारत भालके यांनी सलग तिसºयांदा विजय मिळवित हॅट्ट्रीक साधली.
पंढरपूर शहर व तालुक्यातील २२ गावांतून भालके यांनी ५ हजार मतांची आघाडी घेतली़ पहिल्या फेरीपासून भालके यांनी आपली आघाडी २४ व्या फेरीपर्यंत कायम ठेवत विजय मिळविला. दरम्यान, मतमोजणी केंद्राच्या समोरील रेल्वे मैदानावर राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. मतदारसंघातील विविध गावातून आलेल्या कार्यकर्त्यांनी शहरात मोटारसायकल रॅली काढली.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी सोमवारी अतिशय चुरशीने ७१.२३ टक्के मतदान झाले होते. गुरूवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. सुरूवातीला टपाली मतांची मोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीत पंढरपूर तालुक्यातील कौठाळी, वाखरी, गादेगाव या गावांमधून भालके यांनी ८०४ मतांनी भालके यांनी आघाडी घेतली. पंढरपूर शहर व तालुक्यातील अपक्ष उमेदवार समाधान आवताडे तसेच काँग्रेसचे शिवाजीराव काळुंगे हे रेसमध्ये दिसले नाहीत. सुधाकरपंत परिचारक यांचे मूळ गाव असणाºया खर्डी तसेच आसपासच्या गावांमधून परिचारक यांना ७२० मतांची तसेच मंगळवेढा शहरात परिचारक यांना आघाडी मिळाली़ इतर ठिकाणी मात्र त्यांना आघाडी मिळविता आली नाही.
अखेरच्या आठ फेºयांमध्ये मंगळवेढा भागात भारत भालके, दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे व सुधाकरपंत परिचारक यांच्यात चुरस पाहायला मिळाली. यामध्येही आघाडी मिळवित भारत भालके यांनी विजय संपादन केला.