दिल्लीतून आॅनलाईन केला पंढरीतील डाळिंबाचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:13 PM2019-02-14T13:13:50+5:302019-02-14T13:15:46+5:30
पंढरपूर : पंढरपूर बाजार समिती परिसरातील डाळिंब मार्केट.. कॅरेटमध्ये वजन करून गुणवत्तेनुसार स्वच्छ करून ठेवलेला माल..शेतकरी अन् व्यापारी जमलेले..डाळिंबाच्या लिलावाची ...
पंढरपूर : पंढरपूर बाजार समिती परिसरातील डाळिंब मार्केट.. कॅरेटमध्ये वजन करून गुणवत्तेनुसार स्वच्छ करून ठेवलेला माल..शेतकरी अन् व्यापारी जमलेले..डाळिंबाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू.. पण लिलाव कोण करणार असा प्रश्न पडलेला.. परंतु दिल्लीच्याबाजारपेठेतून आॅनलाईन पद्धतीने भास्कर कसगावडे यांनी लिलावाला सुरुवात केली़ ही प्रक्रिया २० मिनिटे चालली़ या आॅनलाईन लिलावानंतर शेतकरी आणि व्यापाºयांनीही समाधान व्यक्त केले.
याबाबत माहिती देताना भास्कर कसगावडे म्हणाले, आपण महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो़ त्यामुळे पंढरपूर येथील डाळिंबाचा लिलाव कोण करणार, असा प्रश्न माझ्यासह शेतकरी आणि व्यापाºयांनाही पडला़ मात्र मोबाईलचा सदुपयोग केला़ मी या लिलावासाठी डाळिंबाचे वाण कोणते आले आहे, त्याची गुणवत्ता आॅनलाईनच मोबाईलद्वारे पाहिली़ प्रत्यक्षात जेव्हा लिलाव प्रक्रिया सुरू झाली तेव्हा दिल्लीतून एकेक कॅरेटचा लिलाव केला़ एकूणच शेतकºयांना त्या दिवशी कमीत कमी ३० रुपयांपासून ते ६५ रुपयांपर्यंत दर मिळाला़ त्यामुळे शेतकºयांनाही दुकानदार नसताना दर मिळाला आणि व्यापाºयांनाही चांगल्या दरात माल खरेदी करता आल्याने दोघांनीही समाधान व्यक्त केल्याचे भास्कर कसगावडे यांनी सांगितले.
या डाळिंब लिलाव प्रक्रियेत तानाजी गावडे, विश्वास यादव, सुनील गावडे, गणेश कदम, दादा कदम, सुभाष माळी, महादेव दांडगे, संदीप जाधव, हुसेन शेख या शेतकºयांनी तर मुस्ताक बागवान, अक्षय आंबरे, अन्वर बागवान, सज्जन गवळी, आसिम बागवान, निहाल बागवान, समर्थ बागवान या व्यापाºयांनी सहभाग नोंदविला़ एकूण सव्वा दोन लाखांचा आॅनलाईन व्यवहार केला.
आॅनलाईन व्यवहार केलेले डाळिंब दिल्ली, जयपूर, कोलकात्ता, गाझियाबाद, जम्मू काश्मीर या ठिकाणी विक्रीसाठी गेल्याचे भास्कर कसगावडे यांनी सांगितले़
दिल्लीतील व्यापाºयांनाही झाली माहिती
- दिल्ली येथील आझादपूर मार्केटमधून हा लिलाव केला़ पंढरपुरातील डाळिंब लिलाव आणि दिल्लीतील लिलाव यातील फरकही दिल्लीतील व्यापाºयांच्या लक्षात आणून दिला़ शिवाय दरातील तुलनात्मक फरकही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे भास्कर कसगावडे यांनी सांगितले़