पांडुरंग आपला आहे, अन् तो आपलाच राहावा; वारकरी संप्रदाय करणार आंदोलन

By दिपक दुपारगुडे | Published: September 5, 2023 04:17 PM2023-09-05T16:17:42+5:302023-09-05T16:18:11+5:30

पंढरपुरात संप्रदायातील महाराज मंडळी, विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

Pandurang is ours, and it should be ours Varkari community will protest | पांडुरंग आपला आहे, अन् तो आपलाच राहावा; वारकरी संप्रदाय करणार आंदोलन

पांडुरंग आपला आहे, अन् तो आपलाच राहावा; वारकरी संप्रदाय करणार आंदोलन

googlenewsNext

दीपक दुपारगुडे, पंढरपूर (सोलापूर): श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारच्या ताब्यातून सुटावे अशी याचिका डाॅ. सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केले आहे. याचिकेला विरोध करण्यासाठी आम्ही महाराज मंडळी गावा गावात किर्तांनाच्यावेळी लोकांना विचार असतो, त्यावेळी लोकांनी पांडुरंग आपला आहे, अन् तो आपलाच रहावा असे म्हणाले, असे ह.भ. प. सुहास महाराज फडतरे यांनी सांगितले.

पंढरपूर टेम्पल ॲक्ट १९७३ विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेला विरोध करण्यासाठी संदर्भात विठ्ठल भक्त, वारकरी संप्रदायाचे पाईक, पंढरपूर नागरिक आणि काही संप्रदायातील महाराज मंडळी यांची बैठक मंगळवारी सकाळी ११ वाजता संत कैकाडी बाबा मठात झाली आहे. या बैठकीतस ह.भ.प जळगावकर महाराज, ह.भ.प चवरे, ह.भ.प राजाभाऊ मोरे, ह.भ.प. भारत महाराज,  धनाजी गुरव, दीपक वाडदेकर, साईनाथ अभंगराव, दिनकर चव्हाण, मोहन अनपट, सुभाष भोसले, अरुण कोळी, श्रीरंग बागल, दिलीप पवार, रामभाऊ गायकवाड, भीमराव माळी, ॲड. किरण घाडगे, अमोल देसाई, श्रीकांत शिंदे, संदीप मंडवे, राधेश बादले पाटील, अमर सूर्यवंशी, राजाभाऊ उराडे, सुधाकर कवडे, समीर कोळी, बाळासाहेब बागल, संतोष पाडोले, संजय बंडपत्ते, भाजनदास पवार, किरण घाडगे, ॲड सत्त्यम धुमाळ, संतोष बंडगर, दिनकर चव्हाण, दिगंबर सुडके, सारंग कोळी, दत्ता पाटील, गणेश अंकुशराव, ॲड. किर्तीपल सर्वगोड, सोमनाथ पोरे, उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त करावे यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ डाॅ.सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत २५ च्या आसपास ग्रामपंचायतीनी विरोधात ठराव केला आहे. लाखो वारकरी आपल्या पाठीशी आहेत. हे मंदिर सरकारच्या ताब्यात राहावे आंदोलने करणार आहोत. राज्यात पहिल्यांदा हे आंदोलन सरकारच्या बाजूने करणार आहे. आपण वारकरी पध्द्तीने आंदोलन करणार आहोत, असे ह.भ.प. सुहास महाराज फडतरे यांनी सांगितले.

Web Title: Pandurang is ours, and it should be ours Varkari community will protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.