‘पांडुरंग’ने केली २५.७७ लाख लिटर इथेनॉलची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:25 AM2021-03-01T04:25:55+5:302021-03-01T04:25:55+5:30

कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये उत्पादित केलेल्या ९ लाख १ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे ...

Pandurang produced 25.77 lakh liters of ethanol | ‘पांडुरंग’ने केली २५.७७ लाख लिटर इथेनॉलची निर्मिती

‘पांडुरंग’ने केली २५.७७ लाख लिटर इथेनॉलची निर्मिती

Next

कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये उत्पादित केलेल्या ९ लाख १ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, दिनकर नाईकनवरे, बाळासाहेब सालविठ्ठल, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.

कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन १२४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या हंगामात कारखाना व्यवस्थापनाच्या सुयोग्य नियोजनाने ८ लाख ३१ हजार ६६७ मे. टन ऊस गाळप करून ९ लाख १ हजार १११ क्विंटल साखरपोती उत्पादित केली आहेत. कारखान्याचा को-जनरेशन प्रकल्प व डिस्टिलरी प्रकल्पातूनही चांगले उत्पादन सुरू आहे. को-जनमधून ५.४२ कोटी युनिट वीज निर्माण करून २.८२ कोटी युनिट वीज एम.एस.ई.बी.ला विक्री केली आहे. आसवनी प्रकल्पामधून ६६ लाख लिटरचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याकडे आणखी सुमारे २ लाख मे. टन ऊस उपलब्ध असून, कारखाना २५ मार्चपर्यंत चालवून उपलब्ध सर्व उसाचे गाळप करणार आहे.

यावेळी सभापती जयश्री व्हरगर, उपसभापती विवेक कचरे, माजी सभापती भगवान चौगुले, उपसभापती प्रशांत देशमुख, विष्णू रेडे, भाजप तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, संचालक दिनकर मोरे, दिलीप चव्हाण, चंद्रकांत देशमुख, भैरू माळी, तुकाराम डुबल, दाजी भुसनर, हरिदास शिंदे, बाळासाहेब माळी, धोंडीराम पाटील, भजनदास फाळके, वसंत पाटील, राजूबापू गावडे, सीताराम नागणे, शिवाजी कोळवले, पुरुषोत्तम पवार, संचालक हरीश गायकवाड, शिवाजी साळुंखे, ज्ञानदेव ढोबळे, सुरेश आगावणे, बाळासाहेब यलमार, तानाजी वाघमोडे, महेबूब शेख, नामदेव झांबरे, दिनकर कवडे, आनंदराव आरकिले, परमेश्वर गणगे, नागन्नाथ शिंदे, भीमराव फाटे, अरुण घोलप आदी उपस्थित होते.

कोट ::::::::::::::::::

पांडुरंग कारखान्याने २५.७७ लाख लिटर बी-हेव्हीचे इथेनॉल उत्पादन करून त्यासह साखर कारखान्याचा साखर उतारा ११.३० टक्के आहे. हा साखर उतारा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा आहे. उर्वरित संपूर्ण उसाचे लवकरात लवकर गाळप करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे.

- आ. प्रशांत परिचारक

चेअरमन, पांडुरंग कारखाना

Web Title: Pandurang produced 25.77 lakh liters of ethanol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.