‘पांडुरंग’ साखरेपेक्षा इथेनॉलचे उत्पादन वाढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:15+5:302021-03-28T04:21:15+5:30

कारखान्याच्या २९व्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, माजी संचालक दिनकर मोरे, कार्यकारी संचालक ...

‘Pandurang’ will increase ethanol production over sugar | ‘पांडुरंग’ साखरेपेक्षा इथेनॉलचे उत्पादन वाढवणार

‘पांडुरंग’ साखरेपेक्षा इथेनॉलचे उत्पादन वाढवणार

Next

कारखान्याच्या २९व्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

यावेळी उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, माजी संचालक दिनकर मोरे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, संचालक हरिश गायकवाड, शिवाजी साळुंखे, सुरेश आगावणे आदी संचालक मंडळ, अधिकारी उपस्थित होते.

पांडुरंग कारखान्याने सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ११.४५ टक्के साखर उतारा निघाला आहे. ६ कोटी ६३ लाख वीज निर्मिती केली आहे. ८१ लाख इथेनॉलची निर्मिती केली आहे. १५२ दिवसांत ६७०० मे. टन क्षमतेने उसाचे सरासरी गाळप करून १० लाख मे. टन उसाचे गाळप केले आहे. त्यामधून ११ लाख साखर पोत्यांचे उत्पादन घेतले असल्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.

कोट :::::::::::::::::::

पंढरपूर तालुक्यात इतर कारखान्यांचा साखर उतारा ९ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. परंतु पांडुरंग कारखान्याचा साखर उतारा ११.४५ टक्के असा आहे. पांडुरंग कारखाना ११४ किलो, तर इतर कारखान्यात ९० किलो साखर तयार होते. जवळपास २४ किलो साखर पांडुरंग कारखाना जास्त उत्पादन करत आहे. त्यामुळे त्याचा फायदा सभासदांना होत आहे.

- आमदार प्रशांत परिचारक

अध्यक्ष, पांडुरंग कारखाना

Web Title: ‘Pandurang’ will increase ethanol production over sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.