‘पांडुरंग’चा राज्यातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:16 AM2021-06-06T04:16:55+5:302021-06-06T04:16:55+5:30
पांडुरंग कारखान्याने महाराष्ट्रातील सहकारी कारखानदारीतील स्पीड माउंटेड पद्धतीचा हवेतून ऑक्सिजन घेऊन सुपंत ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आला. त्याचे उद्घाटन कारखान्याचे ...
पांडुरंग कारखान्याने महाराष्ट्रातील सहकारी कारखानदारीतील स्पीड माउंटेड पद्धतीचा हवेतून ऑक्सिजन घेऊन सुपंत ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आला. त्याचे उद्घाटन कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी व्हा. चेअरमन वसंतराव देशमुख, उमेश परिचारक, दिनकर मोरे, दाजी पाटील, दिलीप घाडगे, प्रशांत देशमुख, भगवान चौगुले, रोहन परिचारक, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
या प्रकल्पातून दररोज १०० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर निर्मिती होणार आहे. सर्वसाधारण हवेमध्ये ७८ टक्के नायट्रोजन, २१ टक्के ऑक्सिजन व १ टक्का इतर वायू असतात, अशीही नैसर्गिक हवा या प्रकल्पामध्ये खेचून घेतली जाते. पीएसए टेक्नॉलॉजीद्वारे हवेमधून नायट्रोजन व इतर वायू, आर्द्रता धूलिकण आदी अनावश्यक बाबी वेगळ्या केल्या जातात. या प्रकल्पातून वेगळा करण्यात आलेला ९३ ते ९६ टक्के इतकी शुद्धता असणारा ऑक्सिजन निर्माण होतो.
ऑक्सिजन निर्मिती करणे अवघड
साखर संघाचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी साखर कारखाना व संस्थांना आवाहन केले होते. डिस्टिलरी प्रकल्पामधून ऑक्सिजन निर्मिती करणे अडचणीचे आहे. हा प्रकल्प चालू करण्यास जास्त काळ लागतो व खर्चीक आहे. त्यामुळे कमी वेळात हवेतून ऑक्सिजन गोळा करून या प्रकल्पाची उभारणी केल्याचे कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी सांगितले.
----
सहकारी कारखानदारीत पहिला प्रकल्प
या प्रकल्पातून जास्तीत जास्त दवाखान्यांना ऑक्सिजन पुरवठा करून असंख्य लोकांचे प्राण कसे वाचवता येतील, याचा प्रयत्न राहील. या प्रोजेक्टसाठी अत्यंत कमी वेळात उभारणी केली आहे. कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक, सर्व संचालक मंडळांनी मार्गदर्शन, सहकार्य आणि तत्परता दाखविली. त्यामुळे महाराष्ट्र या पद्धतीचा सहकारी कारखानदारीत पहिला ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित करू शकलो, असे कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.