‘पांडुरंग’चे ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:16 AM2021-06-28T04:16:53+5:302021-06-28T04:16:53+5:30
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२१-२२ साठीच्या मिल रोलरचे पूजन कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकर मोरे यांच्या हस्ते करण्यात ...
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२१-२२ साठीच्या मिल रोलरचे पूजन कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, संचालक दिलीप चव्हाण, सुरेश आगावणे, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमार, बाळासाहेब शेख, अरुण घोलप, नागनाथ शिंदे, शिवाजी साळुंखे, चंद्रकांत फाटे, ब्रह्मदेव पवार, आनंदाराव अरकिले, नामदेव झांबरे, गुलाब पोरे, आर. बी. पाटील, एम. आर. कुलकर्णी, संतोष कुमठेकर, रवींद्र काकडे, सय्यदनूर शेख, सोमनाथ भालेकर, रमेश गाजरे, हनुमंत नागणे, महेश देशपांडे, तानाजी भोसले, सोपान कदम, युनियन पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.
कोट ::::::::::
पांडुरंग कारखान्याच्या कार्यकारी संचालक, अधिकाऱ्यांनी गत हंगामात उत्कृष्ट काम केले आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या हंगामात अखंडित काम करून कारखान्याच्या गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. कारखान्याची अंतर्गत सर्व कामे गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी वेळेत करून घ्यावीत.
- आ. प्रशांत परिचारक
चेअरमन, पांडुरंग साखर कारखाना,श्रीपूर