पानगाव ग्रामस्थांनी रस्त्याच्या काँक्रीट साईड गटाराचे काम पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:20 AM2021-04-19T04:20:29+5:302021-04-19T04:20:29+5:30

बार्शी-सोलापूर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम गेल्या तीन महिन्यापासून सुरू आहे. रस्त्यावरील प्रत्येक गावादरम्यान मधोमध धावपट्टी व दोन्ही ...

Pangaon villagers demolished the concrete side of the road | पानगाव ग्रामस्थांनी रस्त्याच्या काँक्रीट साईड गटाराचे काम पाडले बंद

पानगाव ग्रामस्थांनी रस्त्याच्या काँक्रीट साईड गटाराचे काम पाडले बंद

Next

बार्शी-सोलापूर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम गेल्या तीन महिन्यापासून सुरू आहे. रस्त्यावरील प्रत्येक गावादरम्यान मधोमध धावपट्टी व दोन्ही बाजूला बाजूपट्टी त्यानंतर साईड गटार याप्रमाणे काम सुरू आहे. पण कळंबवाडी (पा), बावी (आ), साकत, पिंपरी, उंडेगांव, रस्तापूर, कव्हे, कोरफळे, दडशिंगे आदी गावाचा पानगांवला दैनंदिन ये-जा असल्याने मुख्य रस्त्याची रुंदी कमी पडू शकते. परिणामी अपघातांची संख्या वाढू शकते.

पानगांव थांब्यावर वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर कळंबवाडी रोड ते साकत रोड या भागात रुंदीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

वैराग, मानेगांव याप्रमाणेच पानगांव येथेही रस्त्याची रुंदी धरावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

यावेळी पानगावचे बीट अंमलदार रियाज शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामस्थ व ठेकेदार यांच्यामध्ये समन्वय करुन काम तहकुब

कोट : पानगांव हे वर्दळीचे ठिकाण आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुनी सरकारी जमीन असताना असा सदोष डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) व अंदाजपत्रक कसे बनवले हे पाहणे गरजेचे आहे. रस्ता आणखी रुंद व्हावा ही मागणी आहे.

- अंकुश मोरे,

माजी उपसरपंच, पानगाव

कोट ::::

पीडब्ल्यूडीने सांगितल्या प्रमाणे काम प्रगतिपथावर आहे. ग्रामस्थांची काही तक्रार असल्यास त्यांनी बार्शी उपविभागाशी संपर्क साधावा. संबधित कार्यालयाकडून आदेश येईपर्यंत काम तहकूब करण्यात येईल.

- व्यंकटेश जवांगला, साईट सुपरवायजर

फोटो

१८पानगाव०१

ओळी

सोलापूर-बार्शी मार्गावर सुरू असलेले मात्र पानगाव ग्रामस्थांनी हेच काम बंद पाडले.

Web Title: Pangaon villagers demolished the concrete side of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.