बिबट्याची दहशत.. अंधार पडण्यापूर्वीच लोक घराकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:23 AM2020-12-06T04:23:34+5:302020-12-06T04:23:34+5:30

सोलापूर, अहमदनगर,बीड व पुणे विभागातील वन विभागाचे पथक रावगाव परिसरातील रानोमाळ दिवसभर बिबट्याच्या शोधासाठी फिरले तरी त्याने चकवा ...

Panic of leopard .. People go home before dark | बिबट्याची दहशत.. अंधार पडण्यापूर्वीच लोक घराकडे

बिबट्याची दहशत.. अंधार पडण्यापूर्वीच लोक घराकडे

Next

सोलापूर, अहमदनगर,बीड व पुणे विभागातील वन विभागाचे पथक रावगाव परिसरातील रानोमाळ दिवसभर बिबट्याच्या शोधासाठी फिरले तरी त्याने चकवा दिला. शेतकरी स्वत:च्या जीवाबरोबर गाय,वासरे, शेळ्या, बैल आदी पशुधनाला धोका होऊ नये म्हणून काळजी घेत आहेत.

----गावात कोरोना तर शेतात बिबट्या..

गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याच्या वावराने करमाळा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या ग्रामस्थांची धाकधूक वाढली आहे. कोरोना म्हणतो गर्दी करू नका तर बिबट्या म्हणतो एकटे फिरू नका..अशा व्दिधा मनस्थितीमध्ये ग्रामस्थ आहेत.

----अफवा पसरवू नका..

आमच्या गावात बिबट्या आला,आताच दिसला, तिकडून पळाला असे अनेक कॉल तहसील कार्यालय, पोलीस ठाण्यास दिवसभरात आले. या प्राण्यास पकडण्यासाठी वन विभागाचे पथक आलेले आहे. ठिकठिकाणी पिंजरे लावण्याचे नियोजन झाले आहे. ग्रामस्थांनी अफवा पसरवून भीती निर्माण करू नये मात्र काळजी जरूर घ्यावी.

- समीर माने,तहसीलदार करमाळा.

Web Title: Panic of leopard .. People go home before dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.