समांतर जलवाहिनी मनपा निवडणुकीपूर्वी पूर्ण करू; पालकमंत्र्यांचे आश्वासन
By बाळकृष्ण दोड्डी | Published: March 5, 2023 11:55 AM2023-03-05T11:55:17+5:302023-03-05T11:55:38+5:30
होटगी रस्त्यावरील गांधी नगर येथील एका हॉटेलमध्ये शहर व ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्त्यांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला.
सोलापूर - समांतर जलवाहिनीचे काम मनपा निवडणूक लागण्यापूर्वीच शंभर टक्के पूर्ण करू. यासंदर्भात टेंडर प्रक्रिया लवकर पूर्ण करून काम सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी दिली.
होटगी रस्त्यावरील गांधी नगर येथील एका हॉटेलमध्ये शहर व ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्त्यांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी एका कार्यकर्त्याने समांतर जलवाहिनीचा प्रश्न उपस्थित केला. यावर त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी आमदार सुभाष देशमुख, शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, शशी थोरात, मनीष देशमुख, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, शोभा बनशेट्टी, रुद्रेश बोरामणी आदी उपस्थित होते.