मुलांचा डोळ्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी पालक करत आहेत मुलांचा अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 02:21 PM2021-01-02T14:21:49+5:302021-01-02T14:25:18+5:30
पालकांवर अभ्यासाचा ताण : मोबाइलच्या वापरानंतर मुलांना उन्हात खेळण्यासाठी सोडण्याचा डॉक्टरांचा सल्ला
सोलापूर : कोरोनामुळे शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. यामुळे प्रत्येक मुलाकडे आता मोबाइल आहे. पण मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांना डोळ्यांच्या अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे मुलांचा डोळ्यांवरील ताण कमी व्हावा यासाठी मुलांचा अभ्यास पालक करत आहेत.
पहिली ते पीजीपर्यंतचे सर्व शिक्षण हे ऑनलाइन सुरू आहे. यामुळे मोबाइलमधून शिकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. पण सुरुवातीला ऑनलाइन शिक्षण हे १ तासापर्यंत असायचे. पण दिवाळीनंतर ऑनलाइन शिक्षणामध्ये वाढ होत असून, सध्या २ ते ३ तासांपर्यंत तासिका सुरू आहेत. यामुळे मुलांच्या डोळ्यावर मोठा ताण पडत आहे. यामुळे मुलांना शिक्षणासाठी प्रत्येकवेळी मोबाइल देण्याऐवजी कॉम्प्युटर, लॅपटॉपच्या माध्यमांचा वापर करावा. मुलांचा मोबाइल हाताळणे झाल्यानंतर त्यांना जवळपास एक तास तरी उन्हामध्ये खेळण्यासाठी सोडावे, असे नेत्रतज्ज्ञांचे मत आहे.
सध्या मुले घरी राहत असल्यामुळे पालकही मुलांना शिक्षणासोबत गाणे, संगीत, गिटार यासारखे अनेक क्लासेस ऑनलाइन लावत आहेत. यामुळे मुलांच्या डोळ्यावरचा ताण आणखीनच वाढत जात आहे.
मोबाइलवरचे शिक्षण संपल्यावर मुलांकडून लगेचच मोबाइल काढून घेतले पाहिजे. त्यांना मोबाइलचे व्यसन लागू नये याची काळजीही पालकांनी घ्यायला पाहिजे. आपला पाल्य ऑनलाइन शिक्षण घेत असताना तो अभ्यासच करत आहे का नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. काहीवेळा पालकांचे लक्ष नसल्यामुळे विद्यार्थी ऑनलाइन इतरत्र भरकटू शकतात, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.
याबाबत पालक म्हणतात, मुले वर्गात असताना शिक्षक त्यांना शिकवत होते. पण आत शिक्षक ऑनलाइन अभ्यास देतात, यामुळे मुलांना प्रत्येक बाब मोबाइलवर न आल्याने पालकांना त्यांचा अभ्यास करावा लागतो. शाळा मात्र पूर्ण फी घेते.
ऑनलाइन शिक्षणाचे होणारे दुष्परिणाम
ज्या विद्यार्थांकडे मोबाइल आहे अशाच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेता येतो. पण त्यांना डोळ्यांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक मुलांचे डोळे लाल होणे, उन्हाकडे पाहू न शकणे, चेष्म्याचा नंबर वाढणे, अंधारी येणे अशा प्रकारचे त्रास होत आहेत. मोबाइलचा जास्त वापर झाल्यास दृष्टी जाऊ शकते, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाइल आहे अशाच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेता येतो. पण त्यांना डोळ्यांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक मुलांचे डोळे लाल होणे, उन्हाकडे पाहू न शकणे, चेष्म्याचा नंबर वाढणे, अंधारी येणे अशा प्रकारचे त्रास होत आहेत. मोबाइलचा जास्त वापर झाल्यास दृष्टी जाऊ शकते, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत.
पुस्तके वाचताना कंटाळा
मुले दिवसभर मोबाइलवरच जास्त व्यस्त असतात. घरातील मोबाइल हे त्यांनाच दिल्यासारखे झाले आहेत. दिवसभर मोबाइल दिल्यामुळे मुलांना रात्री झोप लवकर येईना आणि पुस्तके वाचताना लवकर कंटाळा करत आहे.
- गुरुनाथ येळके, पालक
------------
मुलांना गरजेपुरताच द्या मोबाइल
मोबाइलमुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण वाढला आहे. जवळपास ५ ते १६ वर्ष वयोगटातील मुलांच्या डोळ्यांच्या तक्रारी जास्त येत आहेत. यामुळे पालकांनी मुलांना मोबाइल गरजेपुरते देणे जरुरी आहे. सोबतच मुले काय पाहत आहेत याकडेही पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
-डॉ.माधुरी वाळवेकर,