आई वडील शेतात गेले अन् मुलीने घरात गळफास घेतला
By काशिनाथ वाघमारे | Updated: May 27, 2023 21:36 IST2023-05-27T21:34:36+5:302023-05-27T21:36:49+5:30
घरात छताच्या अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आई वडील शेतात गेले अन् मुलीने घरात गळफास घेतला
काशिनाथ वाघमारे, सोलापूर: आई-वडिल शेतात कामावर जाताच गुळपोळी येथे एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने घरात छताच्या अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
राधिका चंद्रकांत टोणपे (वय १६, रा. गुळपोळी, ता. बार्शी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान निदर्शनास आली. तिचे नातेवाईक रामचंद्र अरुण चिकने यांना याची माहिती मिळताच तालुका पोलीसात खबर दिली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार टोणपे परिवार गुळपोळी-मालवंडी रोडवर त्यांच्या शेतात रहातात. आई-वडील शेती करतात. ते शेतात गेले अन घरात कोणी नसताना तिने छताच्या अँगलला ओढणी बांधून आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. ती याच गावातील हायस्कूलमध्ये शिकत असून यावर्षी नववी पास होऊन दहावीत गेली होती. पोलीस तिच्या आत्महत्येचा शोध घेत आहेत. पोलिसांनी तिचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. पुढील तपास हवालदार सर्जेराव गायकवाड करत आहेत.