परितेवाडी खून प्रकरण, फरार प्रियकरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:21 AM2020-12-29T04:21:29+5:302020-12-29T04:21:29+5:30
दि. २५ रोजी सिद्धेश्वर सुभाष जाधव याचा निर्घृणपणे खून झालेला मृतदेह परितेवाडी शिवारात एका चारीत मिळून आला. त्यानंतर सहा. ...
दि. २५ रोजी सिद्धेश्वर सुभाष जाधव याचा निर्घृणपणे खून झालेला मृतदेह परितेवाडी शिवारात एका चारीत मिळून आला. त्यानंतर सहा. पोलीस निरीक्षक अमित शितोळे व त्यांच्या पथकाने तपासाची वेगाने चक्रे फिरवून परिस्थितीजन्य पुराव्यावरून व गुप्त माहितीच्या आधारे हा मयत मुलगा आई व तिचा प्रियकर तात्या कदम यांच्या अनैतिक संबंधास वारंवार विरोध करीत असल्याने व तो अडथळा निर्माण करीत असल्याने मुलाचा जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने निर्घृणपणे खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी आई मुक्ताबाई जाधव हिला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी रविवारी उंबरे (पागे) येथून सायबर सेलच्या मदतीने माहिती घेऊन त्यास अटक केली.
गुन्हा उघडकीस आणण्यासाठी व आरोपींना अटक करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे, तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अमित शितोळे, सहा. पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पोपट काशीद, अशोक बाबर, संजय भानवसे, हजारे, धनाजी शेळके, अजित उबाळे, सोलापूर येथील सायबर सेलचे अन्वर आतार यांनी कामगिरी बजावली.
फोटो
आरोपी
२७ मुक्ताबाई जाधव
२७ तात्या कदम