सोलापूर महापालिका अधिकाºयांच्या आशीर्वादाने ‘अश्विनी’समोर पुन्हा पार्किंग वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:41 PM2019-11-29T12:41:55+5:302019-11-29T12:46:30+5:30
सोलापुरातील होतेय नागरिकांची लूट; न्यायालयाने मक्तेदाराच्या विरोधात निकाल दिल्याचेही अधिकाºयांचे म्हणणे
सोलापूर : महापालिकेतील भूमी व मालमत्ता विभागातील अधिकाºयांच्या आशीर्वादाने अश्विनी सहकारी रुग्णालयासमोरील जागेत पुन्हा पे अँड पार्कच्या नावाखाली वसुली सुरू आहे. मक्तेदाराची मुदत संपली. न्यायालयाने त्याच्याविरोधात निकाल दिल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत. तरीही वसुली सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
अश्विनी रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या राजीव गांधी इनडोअर स्टेडियमच्या मोकळ्या जागेत पे अँड पार्कसाठी महाराणा प्रताप संघटनेला २०१८ मध्ये मक्ता देण्यात आला होता. मक्तेदाराची एक वर्षाची मुदत आठ महिन्यांपूर्वीच संपली आहे. या कामात नुकसान झाल्याचा दावा करून मक्तेदाराने दिवाणी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात स्थगिती दिली नाही, मात्र सुनावणी सुरू झाली. यादरम्यानही पार्किंग वसुली सुरू होती. शिवसेनेचे नगरसेवक भारतसिंग बडूरवाले यांनी या प्रकरणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आवाज उठविला. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाºयांनी मक्तेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र दिले.
या पत्राचे पुढे काय झाले याची पडताळणी भूमी व मालमत्ता विभागातील अधिकाºयांनी घेतलेली नाही. अद्यापही पे अँड पार्कच्या नावाखाली वसुली सुरू आहे. मक्तेदाराला राजीव गांधी इनडोअर स्टेडियमच्या जागेवर वसुली करण्याचा मक्ता देण्यात आला आहे. मात्र त्यांनी संरक्षित भिंत फोडून वसुली सुरू केली आहे. विशेष याबद्दल महापालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.
भूमी व मालमत्ता विभागाच्या प्रमुख सारिका आकुलवार यांना प्रश्न
- प्रश्न - अश्विनी रुग्णालयासमोर अद्यापही वसुली का सुरू आहे?
- या पे अँड पार्कबद्दल पोलिसांकडे तक्रार दिली होती. प्रकरण न्यायालयात असल्यामुळे वसुली थांबविता आली नाही. चार दिवसांपूर्वी न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला असल्याचे अॅड. एस. आर. पाटील यांनी सांगितले आहे. त्यांचे पत्र आले की मक्तेदाराला वसुली थांबविण्याचे आदेश देऊ.
- प्रश्न - सुनावणी न्यायालयाने वसुली करायला मुभा दिली होती का?
- उत्तर - नाही, न्यायालयाने मुभा दिली नव्हती.
- प्रश्न - तरीही वसुली का सुरू राहिली.
- उत्तर - सुनावणीवेळी न्यायालयाने तसे म्हटले होते.
- प्रश्न - न्यायालयाचे लेखी आदेश होते का?
- उत्तर - नाही, आदेश नव्हते.
पे अँड पार्कचा विषय भूमी व मालमत्ता विभागाच्या प्रमुख सारिका आकुलवार यांच्याकडेच आहे. त्याची माहिती आम्ही घेतलेली नाही. पण या प्रकरणात नक्की लक्ष घालू.
- संदीप कारंजे,
नगर अभियंता, महापालिका.