भाजपा सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारा पक्ष - आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 01:23 AM2018-05-21T01:23:03+5:302018-05-21T01:23:03+5:30

लहान पक्ष महत्त्वाचे; सोबत घेतल्यास काँग्रेसची सत्ता

The party that goes to any level for BJP power - Ambedkar | भाजपा सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारा पक्ष - आंबेडकर

भाजपा सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारा पक्ष - आंबेडकर

Next

पंढरपूर : भारतात दोन समाजात तेढ निर्माण करून दंगली घडवल्या जातील, युद्ध लादून सैनिकांना शहीद करण्याचे कामदेखील होईल. यातून आम्ही शांतता राखण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र भाजपा निर्माण करेल. कारण भाजपा सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारा पक्ष असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला.
धनगर आरक्षणासंदर्भात आयोजन झालेल्या मेळाव्यासाठी आंबेडकर पंढरपूर येथे आले होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुकाबला फक्तमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हेच करू शकतात. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आणखी राजकीय शिक्षणाची गरज आहे. काँगे्रसला पुन्हा सत्तेत यायचे असेल, तर लहान पक्षांना सोबत घ्यावे लागेल. मात्र, त्यांनी कर्नाटकाच्या निवडणुकीत त्याचा बोध घेतल्याचे दिसून येत नाही. काँग्रेस पक्ष बदलत नसेल, तर तिसरा पर्याय निर्माण होईल. कर्नाटक येथील काँग्रेस व जेडीएस यांचे सरकार स्थिर राहणार नाही. पुढील तीन महिन्यांमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळणार आहे.
घटनेत तरतूद असलेल्या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, मुस्लीम, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण देण्यास आमचा कोणताही विरोध नसून, त्यांना आरक्षण मिळावे. यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे ते म्हणाले. सत्तांतरानंतर १२ बलुतेदारांचे प्रश्न सोडवित असताना, बहुजन समजाला सोबत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संविधान बदलण्याची शेवटची संधी
भाजपाला संविधान बदलायचे आहे, त्यामुळे ते सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचे कर्नाटकाच्या निवडणुकीनंतर दिसले आहे. २०१९च्या निवडणुका हा भाजपासाठी संविधान बदलण्याची शेवटची संधी आहे. त्यामुळे २०१९पूर्वी अनेक प्रकार दिसून येतील, असे आंबेडकर यांनी सांगितले. मात्र, त्यांचे मनसुबे पूर्ण न होऊ देण्यासाठी समविचारी पक्षांनी देश पातळीवर एकत्र येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

Web Title: The party that goes to any level for BJP power - Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.