सावळेश्वरच्या सरपंचपदी पार्वती गावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:22 AM2021-03-08T04:22:03+5:302021-03-08T04:22:03+5:30
लांबोटी : सावळेश्वर (ता. मोहोळ) च्या सरपंचपदी पार्वती गावडे, तर उपसरपंचपदी सोनाली पैकेकरी यांची निवड झाली. सरपंच व उपसरपंच ...
लांबोटी : सावळेश्वर (ता. मोहोळ) च्या सरपंचपदी पार्वती गावडे, तर उपसरपंचपदी सोनाली पैकेकरी यांची निवड झाली.
सरपंच व उपसरपंच पदासाठी सदस्य दादाराव लांडगे व कल्पना टेकाळे यांनी गुप्त मतदानाची मागणी केली होती. त्यानुसार सरपंच पदासाठी पार्वती गावडे व सखाराम साठे यांचे अर्ज प्राप्त झाले. गुप्त मतदानातून पार्वती गावडे यांना ६ मते, तर सखाराम साठे यांना ५ मते मिळाली. उपसरपंच पदासाठी सोनाली पैकेकरी व कल्पना टेकाळे यांनी अर्ज भरले होते. सोनाली पैकेकरी यांना ६ मते मिळाली, तर कल्पना टेकाळे यांना ५ मते मिळाली. म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी धैर्यशील जाधव यांनी सरपंच म्हणून पार्वती कालिदास गावडे, तर उपसरपंच म्हणून सोनाली मारुती पैकेकरी यांची निवड घोषित केली.
यावेळी गावकामगार तलाठी मुशीर हकीम, ग्रामसेवक जयसिंग गुंड, पोलीस सुनील चवरे उपस्थित होते. सदस्य म्हणून अर्जुन साबळे, अनिकेत गुंड, सखाराम साठे, कल्पना टेकाळे, भागुबाई सोनटक्के, अनिता गावडे, कल्पना गावडे, दादाराव लांडगे, फारुक तांबोळी हे सदस्य उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष धनाजी गावडे, माजी पंचायत समिती सदस्य कालिदास गावडे, तुकाराम शिंदे, बाळासाहेब गावडे, शंकर पवार, नेताजी गावडे, बिरुदेव शेंडगे, नागनाथ गावडे, समाधान गावडे, बंडू कुंभार, शंकर टेकाळे, अंकुश साबळेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
---
०७ पार्वती गावडे
०७ सोनाली पैकेकरी