टोल नाक्यावरून पास, पण शहराच्या नाक्यावर थांबून राहिली जड वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:22 AM2021-04-24T04:22:12+5:302021-04-24T04:22:12+5:30

सोलापूर : संचारबंदीमुळे संपूर्ण राज्यभरात जड वाहतुकीचे प्रमाण घटले आहे. सोलापुरातील प्रमाण ६० टक्‍क्‍यांवर आले आहे. सकाळी सात ते ...

Passed at the toll booth, but heavy vehicles stopped at the city booth | टोल नाक्यावरून पास, पण शहराच्या नाक्यावर थांबून राहिली जड वाहने

टोल नाक्यावरून पास, पण शहराच्या नाक्यावर थांबून राहिली जड वाहने

Next

सोलापूर : संचारबंदीमुळे संपूर्ण राज्यभरात जड वाहतुकीचे प्रमाण घटले आहे. सोलापुरातील प्रमाण ६० टक्‍क्‍यांवर आले आहे. सकाळी सात ते रात्री नऊ दरम्यान जड वाहतुकीला नो एंट्री करण्यात आली असून या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे, याचा ट्रान्सपोर्ट व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला असून या काळात नो एंट्री उठवून शहरातून जड वाहतुकीला परवानगी मिळावी यासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशनने हालचाली चालवल्या आहेत.

सध्या सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत जड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली असून कर्नाटक, आंध्रमध्ये जाणाऱ्या वाहतूकदारांची मोठी गोची होत आहे. सध्या ४० टक्केच वाहतूक सुरू असून दूध आणि फळे वगळता वन औषधे, अन्नधान्य यांची वाहने ही टोल नाके पार करून आली, मात्र शहराच्या नाक्यावर ही वाहने अडकून पडली आहेत. महाराष्ट्रातील संचारबंदीनंतर आता आंध्र आणि कर्नाटमध्ये लॉकडाऊन होत आहे. येथे थांबणाऱ्या वाहनांचा दोन्ही राज्यांतील वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

--

कोठून काय वाहतूक होते...

मराठवाडा : केमिकल

विशाखापट्टणम : गॅस सिलिंडर, ऑक्सिजन

बंगळुरू : इंजेक्शन, औषधी गोळ्या

हुबळी : आयुर्वेदिक औषधे

हैदराबाद : औषधे

---

सध्या संचारबंदीमुळे मोठ्या प्रमाणात मालवाहतूक थांबली आहे. वाहतूक व्यवसायाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अनेक लोकांचा रोजगार थांबला असून या लोकांना अन्नधान्यासह औषधांची गरज पडत आहे. टोल नाक्यावरून ही वाहने शहराच्या सीमेवर येतात, मात्र नो एंट्रीमुळे नाक्यावरच थांबून राहतात. सध्या नो एंट्री उठवण्याची गरज आहे.

- उदयशंकर चाकाेते,

सदस्य ऑल इंडिया काँग्रेस ट्रान्सपोर्ट असोसिएशन

मुंबई, पुणेमार्गे मधुमेहाची औषधे, साध्या सर्दी, ताप, खोकल्यावरील औषधांची वाहतूक वाढली आहे. त्याचबराेबर अन्नधान्याची वाहतूक होते. यापैकी बरीच वाहतूक ही शहराच्या नाक्यावर थांबली आहे. यापूर्वी पालकमंत्र्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

- प्रकाश अवसेकर,

सदस्य, ऑल इंडिया काँग्रेस ट्रान्सपोर्ट असोसिएशन

सध्या संचारबंदी असून जड वाहतुकीला पूर्वीपासून केवळ रात्री नऊ ते सकाळी सात या वेळेत मुभा दिली आहे. यामुळे रात्रीत आलेल्या गाड्या गोडावूनपर्यंत आणून उतरवणे हे जिकिरीचे आहे. याला संचारबंदीचे नियम अडसर ठरताहेत. रात्री दुकाने आणि गोडावून उघडता येत नाहीत.

- केशव हिरासकर,

व्हीआरएल ट्रान्सपोर्ट

Web Title: Passed at the toll booth, but heavy vehicles stopped at the city booth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.