रेल्वेत झोपून प्रवास करणा-या आंध्रच्या प्रवाशाचे दागिन्यांसह पावणेदोन लाखांचा ऐवज पळवला
By काशिनाथ वाघमारे | Published: April 29, 2023 05:24 PM2023-04-29T17:24:08+5:302023-04-29T17:25:22+5:30
कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसांत उशिराने फिर्याद दाखल केली आहे.
काशिनाथ वाघमारे, सोलापूर : रेल्वेत झोपून प्रवास करणा-या आंध्रमधील प्रवाशाचे दागिन्यांसह १ लाख ७२ हजारांच्या ऐवजांची बॅग चोरट्यांनी लांबवली. ही घटना २० एप्रिल रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कुर्ला-कोईमतूर एक्सप्रेसमध्ये घडली. याबाबत पी. हण्डवी (रा.अलुर आंध्रप्रदेश) यांनी कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसांत उशिराने फिर्याद दाखल केली आहे.
पाेलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी पी. हण्डवी हे कुर्ला-कोईमतूर एक्सप्रेसच्या वातानुकुलीत बोगी क्रमांक ४ (सीट नं ५) मधून झोपून प्रवास करत होते. ही गाडी कुर्डूवाडी स्थानक येण्यापूर्वी चोरट्यांनी ६० हजारांचा मोबाइल, ७० हजारांची सोन्याची चेन, २० हजारांची सोन्याची अंगठी,२० हजारांचे काॅस्मेटीक, रोख २ हजार रुपये आणि कागदपत्रे असलेली बॅग चोरट्यांनी पळवून नेली.
याबाबत येथील लोहमार्ग पोलिसांत सीसीटीएनएस प्रणाली बंद असल्याने उशीरा गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक यशवंत शिंदे हे करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"