प्रवाशांनी ठोकला सोलापूर रेल्वे स्थानकावरच मुक्काम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 01:17 PM2019-08-07T13:17:53+5:302019-08-07T13:23:04+5:30

मुंबईतील पावसाचा फटका : बालगोपाळ, आबालवृद्ध हैराण 

Passengers hit Solapur train station! | प्रवाशांनी ठोकला सोलापूर रेल्वे स्थानकावरच मुक्काम !

प्रवाशांनी ठोकला सोलापूर रेल्वे स्थानकावरच मुक्काम !

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईत धुवाधार पावसाचा फटका या प्रवाशांना बसलामुंबईकडे जाणाºया रेल्वे गाड्या अन् राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या रद्दचहा, नाष्टा अन् जेवण स्थानकावरच करावे लागत असल्याने त्यांचे हाल

सोलापूर : मुंबईकडे जाणाºया रेल्वे गाड्या अन् राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या रद्द करण्यात आल्याने तिकडे जाणाºया प्रवाशांना स्थानकावरच मुक्काम ठोकावा लागला. चहा, नाष्टा अन् जेवण स्थानकावरच करावे लागत असल्याने त्यांचे हाल होत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मुंबईत धुवाधार पावसाचा फटका या प्रवाशांना बसला आहे.
 
कोणाला मुंबईला उपचाराला जायचे आहे तर कोणाला पाहुण्यांना भेटायला... कुणाला मुंबईहून इतर ठिकाणी पर्याटनाला तर कुणाला व्यापार-व्यवसायाच्या निमित्ताने... मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक रेल्वे आणि एसटी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासाचे केलेले नियोजन कोलमडल्याचे स्थानकावर थांबलेल्या काही प्रवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आता पाऊस कधी थांबणार आणि आपण कधी मुंबईला पोहोचू, याच प्रतीक्षेत आता प्रवासी बसले आहेत. 

वीज गायब...
- एकीकडे प्रवाशांना गावी जाण्यासाठी गाडी मिळत नसल्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँडवर आसरा घ्यावा लागत आहे़ मंगळवारी सकाळी एसटी स्टँडवरील वीज गेली़ सकाळी गेलेली वीज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आली़ यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता़

मला गुरूवारी डोळ्याच्या आॅपरेशनसाठी चेन्नईला जायचे आहे़ पण यासाठी मी मंगळवारी स्टेशनवर आलो असता चेन्नईला जाणारी गाडी रद्द झाली असल्याचे कळाले़ यामुळे मला नाईलाजाने येथेच थांबून दुसºया गाडीची वाट पहावे लागत आहे़ दुसरी गाडी जाईल का नाही याबाबत मनात शंका निर्माण होत  आहे़
-ए़ यादव
रेल्वे प्रवासी 

Web Title: Passengers hit Solapur train station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.