सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांनी दिली ‘शिवशाही’ला पसंती, दोन गाड्यांची झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 02:34 PM2017-11-23T14:34:47+5:302017-11-23T14:37:37+5:30
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना अधिकाधिक तत्पर आणि अत्याधुनिक सेवा देण्यासाठी सुरु केलेल्या ‘शिवशाही’ या वातानुकूलित सेवेला पसंती दिल्याचे दैनंदिन प्रवासी भारमानावरुन दिसू लागले आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २४ : राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना अधिकाधिक तत्पर आणि अत्याधुनिक सेवा देण्यासाठी सुरु केलेल्या ‘शिवशाही’ या वातानुकूलित सेवेला पसंती दिल्याचे दैनंदिन प्रवासी भारमानावरुन दिसू लागले आहे. प्रवाशांची ही निकड लक्षात घेऊन महामंडळाने सोलापूर आगारासाठी आणखी दोन बसची पुण्याला जाण्यासाठी सोय केली आहे. लवकरच आणखी पाच गाड्यांसाठी मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा वाहतूक अधिकारी अश्वजीत जानराव यांनी लोकमतशी बोलताना दिली.
१ सप्टेंबर रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारासाठी पहिली शिवशाही बस मिळाली. प्रवाशांकडून पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला. सोलापूर-पुणे दैनंदिन ये- जा करणारा प्रवासी वर्ग सोलापुरात मोठ्या प्रमाणात आहे. ही निकड लक्षात घेऊन ही बस सुरु झाली आणि पाहता पाहता दोन महिन्यांत या बसने प्रवाशांना आपलेसे केले. हा प्रतिसाद पाहून सोलापूर आगारातून आणखी दोन बसची सोय करण्यात आली आहे.
सोलापुरातून पहिली बस सकाळी ७ वाजता आणि नव्याने सुरु झालेल्या दोन गाड्यांमध्ये एक सकाळी ९ आणि दुसरी ११ वाजता सोडण्यात आली आहे. याच गाड्या स्वारगेटहून परत सोलापूरकडे प्रवाशांना घेऊन परततात. सध्या या तिन्ही गाड्यांमध्ये सरासरी ६० ते ६५ टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. दैनंदिन पुण्याकडे जाणाºया बसचे भारमान ५७ ते ५८ टक्के आहे. शिवशाहीचे हे प्रमाण त्यातुलनेत अधिक आहे. लांबपल्ल्याचा प्रवास करताना सुरक्षित आणि तत्पर सेवेला प्रवासी नेहमीच पसंती देतात. हा विचार करुनच सोलापूर आगारातून ही सुविधा देत असल्याचे जानराव यांनी स्पष्ट केले.
आगामी काळात आणखी ५ गाड्या महामंडळाकडे मागवण्यात येणार आहेत. दरम्यान लवकरच दोन गाड्या येणार असून, तपासणीसाठी त्या प्रलंबित आहेत. प्रवाशांनी प्रवासकाळात समस्या जाणवल्यास सोलापूर विभागाशी संपर्क साधावा, त्यांचे निराकरण केले जाईल, अशी ग्वाही दिली. याशिवाय दैनंदिन बससंदर्भातही प्रवाशांसाठी लांबपल्ल्याच्या असो व ग्रामीण भागात धावणाºया बस अधिक सुरक्षित आणि तत्पर सेवा देण्यासाठी विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्या अधिपत्याखाली सर्व अधिकारी, चालक, वाहक, यांत्रिक विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
---------------------------
ग्रामीण भागाकडे लक्ष द्या
च्प्रवाशांच्या सेवेसाठी अविरत सेवा देणाºया महामंडळाने शहरी भागात सेवा गतिमान करताना ग्रामीण भागात धावणाºया बसकडेही लक्ष द्यावे. अनेकवेळा ग्रामीण भागातील गाड्यांचे वेळापत्रक कोलमडते. याचाच परिणाम प्रवासी खासगी वाहनांकडे वळतात. नवनवीन योजना कार्यान्वित करताना मूलभूत सेवा पुरवण्याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
--------------------------
बसमधील सुविधा...........
संपूर्ण वातानुकूलित बस.
प्रत्येक आसनाला कंट्रोल बटन
दोन बाय दोन पुशबॅक आसने
प्रत्येक खिडकी आसनाजवळ मोबाईल चार्जिंग पॉइंट
आतील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस ट्रॅकर
उत्कृष्ट सस्पेंशन, सूचनेसाठी चालकाकडे माईक व्यवस्था
बसच्या पुढे-मागे एलईडी डिस्प्ले
मोठे सामान/पार्सलसाठी डिक्की