कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्याने रुग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:16 AM2021-07-16T04:16:35+5:302021-07-16T04:16:35+5:30
माळशिरस तालुक्यात दररोज १०० पेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. तालुक्यात दोन कोविड केअर सेंटर कार्यरत असून तेथे ...
माळशिरस तालुक्यात दररोज १०० पेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. तालुक्यात दोन कोविड केअर सेंटर कार्यरत असून तेथे रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत कोविड केअर सेंटर अंतर्गत नेमलेले मनुष्यबळ कार्यमुक्त करण्याबाबतचे पत्र तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामध्ये ५० टक्के क्षमतेपेक्षा कमी रुग्ण असलेले कोविड सेंटर बंद करून कंत्राटी मनुष्यबळ कमी करावे अशा सूचना तालुकास्तरावर आरोग्य अधिकाऱ्यांना केल्या आहेत. परंतु रुग्णांची सख्या वाढत आहे. अशा काळात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
कार्यमुक्त केले तरीही रूग्णसेवा सुरूच
महाळूंग कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची पर्वा न करता दिवस-रात्र रुग्णांची सेवा करून आपले कर्तव्य बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांनी काम थांबवल्यास कोविड सेंटरची यंत्रणा विस्कळीत होईल व रुग्णांचे हाल होतील. म्हणून येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांची सेवा अखंडितपणे चालू ठेवली आहे.