..यापुढे ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:24 AM2021-09-18T04:24:12+5:302021-09-18T04:24:12+5:30

उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष ...

..The patient will no longer suffer from lack of oxygen | ..यापुढे ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावणार नाही

..यापुढे ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावणार नाही

Next

उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार बबनराव शिंदे, नगराध्यक्ष साधना भोसले, जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले उपस्थित होते.

पुढे पालकमंत्री भरणे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. कोणत्याही रुग्णास उपचार करताना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये. यासाठी जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालय तसेच मेडिकल कॉलेज येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.

तसेच रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य होणार आहे. यामुळे रुग्णालयातील यंत्रणेवरचा ताण कमी होऊन रुग्णांना वेळेत योग्य उपचार करणे शक्य होणार आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचेही भरणे यांनी सांगितले.

शासकीय रुग्णालयात कायमस्वरुपी ऑक्सिजन

जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर, माळशिरस येथे हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प (पीएसए) तसेच शासकीय रुग्णालयात आठ ठिकाणी द्रव्यरुप ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत. शासकीय रुग्णालयात कायमस्वरुपी ऑक्सिजनची व्यवस्था होणार आहे. यामुळे ऑक्सिजन टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचे डॉ. प्रदीप ढेले यांनी यावेळी सांगितले.

फोटो : पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीची प्रकल्पाचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, नगराध्यक्ष साधना भोसले, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले.

Web Title: ..The patient will no longer suffer from lack of oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.