पाटील-बागल गटाची हातमिळवणी, शिंदे-जगताप गटाविरोधात लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:56 AM2021-01-13T04:56:06+5:302021-01-13T04:56:06+5:30

करमाळा शहरापासून अवघ्या साडेपाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पोथरे कान्होळा तर नीलज हे सीना नदीच्या काठावर वसले आहे. पोथरे ग्रामपंचायत ...

Patil-Bagal group handshake, Shinde-Jagtap group fighting | पाटील-बागल गटाची हातमिळवणी, शिंदे-जगताप गटाविरोधात लढत

पाटील-बागल गटाची हातमिळवणी, शिंदे-जगताप गटाविरोधात लढत

Next

करमाळा शहरापासून अवघ्या साडेपाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पोथरे कान्होळा तर नीलज हे सीना नदीच्या काठावर वसले आहे. पोथरे ग्रामपंचायत १९५३ साली स्थापन झाली. या ग्रामपंचायतीवर गेले दोन टर्मपासून बागल गटाची सत्ता आहे. या गावातील कार्यकर्ते तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असतात. आदिनाथ व मकाई कारखान्याचे संचालक, जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सदस्य व सभापती पद भोगलेल्या गावातील कार्यकर्त्यांकडून गावचा म्हणावा तसा विकास झालेला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मांगी मध्यम प्रकल्पातील पाण्यावर येथील शेती अवलंबून आहे. जवळपास ८० टक्के क्षेत्र बागायती असून मांगीमधून कॅनॉलव्दारे मिळणा-या पाण्यावरच येथील राजकारण चालते. गायरानमध्ये खोदलेल्या विहिरीतून नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली असून एकआड दिवस पाणीपुरवठा करण्यात येतो. विहिरीतील पाणी संपले की प्रत्येक उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊन गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो, असे गावच्या पारावर बसलेले कुंडलिक जाधव, बबन जाधव यांनी सांगितले. गावात साडेतीन पीठापैकी एक पुरातन असे ऐतिहासिक शनैश्वर मंदिर आहे. मंदिरात दर्शनासाठी दूरवरून भाविक नियमित येतात, पण मंदिर व परिसराचा विकास झालेला नाही असे विकास जाधव यांनी सांगितले.

एकूण सदस्य - ११ एकूण मतदार - पोथरे : ३६००, निलज : ४५५

प्रमुख लढत - श्री भैरवनाथ शेतकरी विकास पॅनल.

श्री शनैश्वर ग्रामविकास पॅनल.

प्रचारातील मुद्दे

ग्रामपंचायतीच्या प्रत्येक निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढणारे बागल गटाचे प्रकाश पाटील, हरिभाऊ झिंजाडे, सोपान शिंदे, किसन शिंदे यांनी नारायण पाटील गटाबरोबर युती करून आ. संजयमामा शिंदे व माजी आ. जगताप गटाच्या धनंजय झिंजाडे, शहाजी झिंजाडे व बबन जाधव यांना आव्हान दिले आहे. निवडणुकीत लिखित जाहीरनामा नसला तरी प्रचारात मात्र अंतर्गत रस्ते, गटार व पाणी पुरवठा, दिवाबत्ती या प्राथमिक सोयी-सुविधा देण्याचे आश्वासन दोन्ही पॅनलकडून मतदारांना दिले जात आहे.

कोण कोणाविरोधात लढतोय...

भैरवनाथ शेतकरी विकास पॅनलकडून नवनाथ शिंदे, माया शिंदे, विठ्ठल शिंदे, साधना कडू, रेखा शिंदे, दादा शिंदे, शरद शिंदे, राजूबाई झिंजाडे, राजूबाई गोसावी, मीनाक्षी शिंदे, सागर झिंजाडे हे उमेदवार असून श्री शनैश्वर ग्रामविकास पॅनलकडून दीपाली जाधव, अंकुश शिंदे, जनाबाई शिंदे, पमराज शिंदे, मालन हिरडे, संतोष ठोंबरे, दीपाली झिंजाडे, रघुवीर जाधव, राणी काळे, सुनीता झिंजाडे, धनंजय झिंंजाडे हे लढत देत आहेत.

फोटो आहे.

Web Title: Patil-Bagal group handshake, Shinde-Jagtap group fighting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.