Breaking; पटवर्धन कुरोली बंधारा पाण्याखाली; नदीकाठच्या गावांवर पुराची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 10:32 AM2020-09-19T10:32:50+5:302020-09-19T10:33:21+5:30
सांगोला परिसराकडे जाणारी वाहतूक बंद; काही गावांचा संपर्क तुटला
पटवर्धन कुरोली : पंढरपुर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. भिमानदीत यापूर्वी उजनी जलाशयातून सोडण्यात येत असलेला विसर्ग व स्थानिक परिसरात पडत आसलेल्या पावसामुळे पटवर्धन कुरोली भीमा नदीवरील कोल्हापूर बंधारा शुक्रवारी रात्री पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पिराची कुरोली- पट कुरोली गावाचा संपर्क तुटला आहे. सांगोला, अकलूज परिसराकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंध करण्यात आली आहे.
मागील वर्षी दोन वेळा भीमा नदीला महापूर आला होता त्यामध्ये नदी काठच्या गावातील नागरिकांच्या घरात, दुकानात बागायती शेतात पाणी जाऊन कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालं होतं. वर्षभरानंतर ही त्यांची अनेकांना नुकसान भरपाई मिळाली नसताना आता पुन्हा नदीवरील बंधारे पाण्यात जात असल्याने नदी काठच्या गावांवर पुन्हा पुराचे संकट गोंगावत असल्याने शेतकरी नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे.
____________________
पंधरपुराय ६३ हजाराचा विसर्ग..
उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने उजणीतून भीमा नदीच्या 25 हजाराचा विसर्ग सुरू आहे. वीर धरणातून ही सोडण्यात येत असलेला विसर्ग भीमा नदीच्या मिसळत आहे. शिवाय नदीला जोडणाऱ्या ओढ्यातून मोठा ऊसर्ग भीमा नदीत मिसळत असल्याने पंढरपुरात भीमा नदीतून 63 हजार कयुसेक विसर्ग वाहत आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.