भीमसैनिकांनी इशारा देताच आंबेडकर चौकात उभारतोय मंडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:42 AM2020-12-05T04:42:09+5:302020-12-05T04:42:09+5:30
बुद्धवंदना घेऊन कामाची पूजा बुधवारी आंबेडकर पुतळ्याजवळ बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर भीमसैनिकांच्या हस्ते पूजा करून मंडप घालण्याचे काम हाती ...
बुद्धवंदना घेऊन कामाची पूजा
बुधवारी आंबेडकर पुतळ्याजवळ बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर भीमसैनिकांच्या हस्ते पूजा करून मंडप घालण्याचे काम हाती घेण्यात आले. यावेळी जी. एम. ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे, बबन शिंदे, महादेव ठोंबरे, नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बमगुंडे, गौतम चंदनशिवे, राहुल शंखे, नागेश बंगाळे, विजयानंद उघडे, चाचा सोनवणे, सूरज गायकवाड, सुधाकर तळभंडारे, भारत बाबरे, संतोष आईडळे, श्याम शिंगे, अण्णासाहेब वाघमारे, शेरा मोकाशी, राजरत्न फडतरे, सुजाता वाघमारे, फुलावती काटे, आशा कांबळे, शारदा गजभिये, शाहीर मधुकर साळवे आदी उपस्थित होते.
कोट
कोरोनामुळे भीमसैनिकांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अगदी साधेपणाने केली. मिरवणूक न काढता एक सामाजिक बांधिलकी जोपासली. लॉकडाऊननंतर आता सर्वच व्यवहार, उत्सव सुरू झाले आहेत. हा मुद्दा पकडून भीमसैनिकांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंदोलनाचा इशारा दिला होता. पालिकेनेही एक पाऊल मागे घेतले.
-आनंद चंदनशिवे,
प्रदेश प्रवक्ते - वंचित बहुजन आघाडी.